Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्षभरात ‘या’ 5 भारतीय धुरंधरांनी गाजवली परदेश वारी; अव्वलस्थानी अनपेक्षित खेळाडू

वर्षभरात 'या' 5 भारतीय धुरंधरांनी गाजवली परदेश वारी; अव्वलस्थानी अनपेक्षित खेळाडू

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
R-Ashwin

Photo Courtesy: Twitter/ICC


सन 2022 हे वर्ष आता जवळपास संपले आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंना महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यामागे त्यांच्या फिटनेस आणि दुखापतींची कारणं होती. मात्र, काही खेळाडू असेही होते, ज्यांनी हे वर्ष गाजवले. त्यांनी फक्त भारतातच नाही, तर परदेशातही आपल्या बॅटमधून आग ओकली. आता या खास लेखातून आपण 2022मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…

सन 2022मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज
5. आर अश्विन
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याने आपले योगदान दिले. फक्त गोलंदाजीतूनच नाही, तर अश्विनने फलंदाजीतूनही भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या. अश्विनने 2022मध्ये परदेशात एकूण 4 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 7 डावात फलंदाजी करताना 183 धावा चोपल्या. या धावा त्याने 30.50च्या सरासरीने केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश होता. या वर्षातील बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावातील त्याची खेळी भारताला विजय मिळवून देणारी ठरली. यादरम्यान तो एक वेळा नाबाद राहिला. 58 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या होती.

4. विराट कोहली
जवळपास प्रत्येक विक्रमात सामील असणारा विराट कोहली (Virat Kohli) या विक्रमाच्या यादीत कसा काय नाव येऊ देणार नाही. विराटने भारतासाठी परदेशात कसोटी क्रिकेट (Test Cricket) खेळताना फार मोठ्या खेळी केल्या नाहीत. मात्र, त्याने केलेल्या धावांमुळे तो या यादीत चौथ्या स्थानी आहे. विराटने परदेशात 4 कसोटी सामन्यातील 8 डावात फलंदाजी केली. यामध्ये त्याने 26.28च्या सरासरीने 184 धावा चोपल्या. या धावा करताना त्यानेही एक अर्धशतक केले. विराटही यादरम्यान फक्त एकदा नाबाद राहिला. तसेच, 79 ही विराटची यादरम्यानची सर्वोत्तम खेळी होती.

3. श्रेयस अय्यर
सन 2022मध्ये कसोटीत परदेशात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तिसऱ्या स्थानी आहे. श्रेयसने यावर्षी परदेशात एकूण 3 सामने खेळले. यातील 5 डावात फलंदाजी करताना त्याने 59च्या शानदार सरासरीने 236 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. विशेष म्हणजे, श्रेयसही 3 सामन्यात एक वेळा नाबाद राहिला होता. यासोबतच श्रेयसची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही 87 होती.

2. चेतेश्वर पुजारा
भारतीय संघाची दुसरी ‘भिंत’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) होय. पुजाराने यावर्षी कसोटीत शतक साकारून आपला 1443 दिवसांचा शतकाचा वनवास संपला होता. त्याने परदेशात कसोटीत खेळताना एकूण 5 सामने खेळले. यादरम्यान त्याने 10 डावात फलंदाजी केली. यावेळी फलंदाजी करताना त्याने 45.44च्या सरासरीने 409 धावा चोपल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली. पुजारा यादरम्यान 1 वेळा नाबाद राहिला होता. यादरम्यान पुजाराची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 102 इतकी होती.

1. रिषभ पंत
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खराब फॉर्मात असलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याची बॅट कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात चांगलीच तळपली. त्याने यादरम्यान फलंदाजी करताना 5 सामन्यातील 9 डावात 61.87च्या सरासरीने 495 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतकेही झळकावली. विशेष म्हणजे, यादरम्यान एक वेळा नाबाद राहिलेल्या पंतची 146 ही 2022मध्ये परदेशात कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या होती. (Top 5 Indian players who score highest overseas Test runs in 2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असे 5 खेळाडू, ज्यांच्या घरी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन; यादीतील 4 खेळाडू भारतीय
राम राम 2022: यावर्षी टीम इंडियाला मिळाले 5 हिरे; पाहा कशी होती कामगिरी


Next Post
Photo Courtesy: Twitter/Instagram/Urvashi Rautela

'तू काळी जादू केली', रिषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा चाहत्यांकडून ट्रोल

Virat-Kohli-And-Rohti-Sharma

Bye Bye 2022 : भारताबाहेर वनडेत 'या' 5 भारतीयांची तळपलीय बॅट, एकाची सरासरी 90पेक्षाही जास्त

Rishabh Pant accident

अपघात झाल्यानंतर उपस्थितांकडून पंतच्या साहित्याची चोरी? व्हिडिओ पाहून होईल शेकेचं निरसन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143