भारतीय क्रिकेट संघाने 2022 या वर्षातील आपला अखेरचा सामना रविवारी (25 डिसेंबर) खेळला. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पराभव झाल्यानंतर या अखेरच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत, भारताने वर्षाला विजयी निरोप दिला. हे वर्ष भारतीय संघासाठी संमिश्र ठरले. मात्र, भारतीय संघातील फलंदाज श्रेयस अय्यर याच्यासाठी हे वर्ष लाभदायकच ठरले. त्याने संपूर्ण वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतासाठी सर्वाधिक धावा काढण्याचा मान मिळवला.
श्रेयस हा मागील दोन वर्षापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र, 2022 मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ दाखवला. त्याने या वर्षात 5 कसोटी सामने खेळताना 60.28 च्या सरासरीने 422 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. यात त्याने 92 धावांची सर्वाधिक खेळी केली.
श्रेयसने अशाच प्रकारचा खेळ वनडे क्रिकेटमध्ये देखील दाखवला. त्याने 17 सामने खेळताना 55.69 च्या धमाकेदार सरासरीने 6 अर्धशतके व एका शतकाच्या मदतीने 724 धावा कुटल्या. तर, टी20 क्रिकेटमध्येही त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. 35.61 च्या सरासरीने 461 धावा कुटताना त्याचा स्ट्राईक रेट हा 141.15 असा जबरदस्त होता.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील त्याची एकूण कामगिरी लक्षात घेतल्यास त्याने 39 सामन्यांच्या 40 डावांमध्ये त्याने 48.75 च्या सरासरीने 1609 धावा काढल्या. यामध्ये 14 अर्धशतक व एक शतक सामील आहे.
त्याच्या पाठोपाठ सूर्यकुमार यादव याचा क्रमांक लागतो. त्याने 44 सामन्यात 1424 धावा काढल्या. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिषभ पंत याने 44 सामन्यात 1380 धावा जमवलेल्या. विराट कोहली 37 सामन्यात 1348 धावांसह चौथ्या व कर्णधार रोहित शर्मा 39 सामन्यात 995 धावांसह पाचव्या स्थानी आहे.
(Shreyas Iyer Scored Most Runs In 2022 For Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल





