---Advertisement---

‘झिरो’मुळे विराटचा सोशल मीडियावर होतोय बाजार, मीम्स व्हायरल करत चाहते साधतायत निशाणा

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 6:06 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात शुक्रवारी (२१ जानेवारी) वनडे मालिकेतील दुसरा सामना (Second ODI) झाला. बोलँड पार्क येथे झालेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खातेही न खोलता पव्हेलियनला परतला. ५ चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने फिरकीपटू केशव महाराजच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने एक फटका मारला आणि दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमाने झेल टिपत त्याला बाद केले. 

अशाप्रकारे पुन्हा एकदा विराटने त्याच्या चाहत्यांची निराशा केली आहे. त्याच्या याच अपयशावर चिडलेल्या चाहत्यांनी त्याच्यावर मीम्स बनवायला सुरू केले आहेत. याबरोबरच ट्वीटरवर डक ट्रेंडमध्ये आला आहे.

व्हिडिओ पाहा- अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

काहींनी विराटला ट्रोल करताना लिहिले आहे की, विराटच्या चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतिक्षा आहे, आणि किंग कोहलीने फक्त एक झिरोचा स्कोर केला आहे.

तर काही ट्वीटर वापरकर्त्यांनी विराटची मजा घेत लिहिले आहे की, विराट कोहली फक्त १०० धावांनी शतक बनवण्यापासून हुकला आहे. तसेच अनेकांनी त्याच्यावर वेगवेगळे मीम्स बनवले आहेत.

https://twitter.com/earthtoakash/status/1484458606766424064?s=20

https://twitter.com/AkshatOM10/status/1484458796273389572?s=20

विराटच्या बॅटमधून शेवटचे शतक २०१९ साली आले होते. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांची शंभरी गाठण्यासाठी संघर्ष करताना दिसतो आहे.

सर्वाधिक डकमध्ये (शून्यावर बाद होणे) सेहवागची बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद होत विराटची ही वनडे क्रिकेटमध्ये खाते न खोलता शून्यावर बाद होण्याची १४ वी वेळ होती. यापूर्वी तो शेवटचा २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी तो दोन चेंडूंवरच आपली विकेट गमावून बसला होता. यासह त्याने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमात मागे सोडले आहे. हे दोन्ही क्रिकेटर वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येकी १३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

तसेच या विकेटसह विराट तिन्ही स्वरूपात भारताकडून सर्वाधिकवेळा शून्यावर होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तो ३१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर विकेट गमावून बसला आले. याबाबतीत त्याने माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ वेळा शून्यावर बाद झाला होता. या विक्रमात अव्वलस्थानी सचिन तेंडूलकर आहे, जो ३४ वेळा शून्यावर आपली विकेट गमावून बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: अंपायरिंग सोपी नसते!! फलंदाजाच्या त्या शॉटमुळे पंचांची उडाली दाणादाण, मग झाले असे काही

पंतच्या ‘पॉवरफुल’ खेळीने रचले विक्रमांचे इमले; दक्षिण आफ्रिकेत फक्त रिषभचाच डंका

काहीतरी हटके अन् वाघासारखी डरकाळी! विकेट घेताच गोलंदाजाचे अनोखे सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

हेही पाहा-

अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---