टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद रविवारी (13 नोव्हेंबर) इंग्लंडने जिंकले. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच विकेट्स राखून पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तान संघ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. नेटकरी अंतिम सामन्यात येऊन पराभूत झाल्यामुळे पाकिस्तान संघाची खिल्ली उडवताना दिसत आहे. यामध्ये भारतीय चाहत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसते.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील हा टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. उभय संघांतील ही लढत चांगलीच रोमांचक ठरली. पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये पाकिस्तान संघ 8 विकेट्सच्या नुकसानावर 137 धावा करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य 19 व्या षटकात पाच विकेट्सच्या नुकसानावर गाठले. पाकिस्तान संघ पराभूत झाल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या मिम्स शेअर करत आहेत. अनेकजण पाकिस्तान संघ आणि त्यांच्या खेळाडूंना ट्रोल करतानाही दिसतात.
For the folks who are still in 1992.#PKMKBForever#PAKvENG #EngvsPak pic.twitter.com/jhwMzKI6jG
— बिहारी मानुष (@aditya_0115) November 13, 2022
दरम्यान, उपांत्य फेरी सुरू होण्याच्या आधी पाकिस्तान संघ या फेरीत पोहोचण्याच्या शक्यता मावळल्या होत्या. परंतु सुपर 12 फेरीच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँड्सकडून पराभूत झाला. आफ्रिकी संघाच्या या पराभवामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि त्यांनी अंतिम सामन्यात देकील जागा पक्की केली. पाकिस्तानने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा, इंग्लंडने उपांत्य सामन्यात भारताला पारभूत करून अंतिम सामन्यासाठी जागा पक्की केली.
🥳🥳🔥 Indianspic.twitter.com/JfnrJ4NDrn
— Prateek (@ucancallme_X_) November 13, 2022
https://twitter.com/MaheshN66252385/status/1591757392974610433?s=20&t=9Gv6MNHJuyTuJn0T_mvI8g
https://twitter.com/GHellbrothers/status/1591756052911230977?s=20&t=UhlIDApuoVIOtAwaEv9zTQ
दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडला विजयासाठी 19 व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासाठी पाकिस्तानने दिलेले 138 धावांचे लक्ष्य सुरुवातील सोपे वाटत होते, पण शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी इंग्लंडच्या सुरुवातीच्या विकेट्स झटपट घेतल्या. एका क्षणाला असे वाटू लगले होते की, इंग्लंड संघाला हे लक्ष्य गाठणे खूप कठीण जाईल. पण 16 व्या षटकात शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. शाहीनने त्याच्या कोट्यातील चार षटकेही टाकली नाहीत. त्याने टाकेल्लया 2.1 षटकात 13 देत एक विकेट घेतली.
#PKMKBForever#EngvsPak #PakVsEngFinal #PAKvsEng
Indian fans be like :- pic.twitter.com/ysbRXM1AiF— 👌⭐ 👑 (@superking1816) November 13, 2022
आफ्रिदीला झालेली दुखापत पाकिस्तानला चांगलीच महागात पडली. कारण संघाला गरज असताना त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या तिसऱ्या षटकातील राहिलेले पाच चेंडू इफ्तिखार अहमदने टाकले आणि तब्बल 13 धावा खर्च केल्या. आफ्रिदी जर शेवटपर्यंत मैदानात उफस्थित असता, तर तो सामन्याच्या निकालावर देखील प्रभाव पाडू शकत होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकप: 2007 ते 2022, ‘हे’ आहेत फायनलमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेले खेळाडू, यादी पाहाच
तुमची कर्म.. बाकी काही नाही! पाकिस्तान हरताच अख्तरचे तुटले हृदय, पण मोहम्मद शमीच्या कमेंटने वेधले सर्वांचेच लक्ष