टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत रविवारी(दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून मात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 137 धावा केल्या आणि याचे प्रत्युत्तर देताना इंग्लंडने 19व्या षटकातच हे आव्हान मोडून काढले. भारत आणि पाकिस्तानचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग करणारा इंग्लंड हा जगातील एकूलता एक देश आहे, ज्याच्याकडे एकाच वेळी एकदिवसीय विश्वचषक आणि टी20 विश्वचषक हे दोन्ही आहेत.
इंग्लंडने पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) याच्या नेतृत्वाखाली 2010मध्ये पहिल्यांदा टी20 विश्वचषक जिंकलेला, त्याच्या तब्ब्ल 12 वर्षानंंतर जोस बटलर (Jos Buttler) याने हा कारनाम्याची पुनरावृत्ती केली. या मोठ्या यशानंतर कर्णधार बटलरने संघातील 3 खेळाडूंना या विजयाचे श्रेय दिले. त्याचबरोबर त्याने बेन स्टोक्स याला विशेष पद्धतीने आभार मानले आहे. स्टोक्सने या सामन्यात 49 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी करत इंग्लंड संघाला विश्वविजेता बनवले. त्याने आपल्या डावात 5 चौकार आणि 1 षटकार लगावलेले.
विश्वचषकाच्याआधी पाकिस्तानचा दौरा फायद्याचा ठरला
बटलर म्हटला की,”टी20 विश्वचषक जिंकल्यावर पूर्ण संघाला गर्व आहे. ही एक शानदार स्पर्धा होती. आम्ही ऑस्ट्रेलियाला येेण्याआधी पाकिस्तानचा दौरा केलेला, जो की संघासाठी महत्वपूर्ण ठरलेला.”बटलरने संघाचेे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांचे कौतुक करत म्हटला की,” ते चांगल्या पद्धतीने संघात मिसळले आणि आमच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये काही ऑस्ट्रेलियन देखील आहेत. मॉट यांनी प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व केले. त्यांंनी खेळाडूंना स्वातंत्र देण्याबरोबरच त्यांनी स्वत:च्या मनाप्रमाणे खेळण्याची सूट देखील दिली.”
विश्वचषक जिंकण्याचे श्रेय संघातील काही खेळाडूंना देत बटलर म्हटला की,”आदिल रशीद (Adil Rashid) याचे षटक खूप चांगले होते. तो संघात नेहमी असा खेळाडू बनून येतो, ज्याला आम्ही कठीण परिस्थितीत गोलंदाजीसाठी बोलवतो. बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने रनरेट आटोक्यात आणला. तो काहीही करू शकतो. त्याने या विश्वचषकात त्याच्या अनुभवाचा चांगला उपयोग केला . या दरम्यान मोईन अली (Moen Ali) याने देखील त्याची सुरेख साथ दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पाराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, भारतीय चाहते भरतेच खुश
‘पाकिस्तान मी तुमच्यासोबत उभा आहे, आपल्याला भारतात वर्ल्डकप जिंकायचाय’