---Advertisement---

भारतीय कर्णधाराने मागितली सिराजची माफी, कारण काय?

On: शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024 4:03 PM
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. सामन्याचा पहिला दिवस रोमांचक ठरला होता. सुरुवातीला बांगलादेशी गोलंदाजांनी भारतावर दबाव आणला. पण जडेजा आणि अश्विनने भारतासाठी चमकदार कामगिरी दाखवली. अश्विनने शानदार शतक ठोकले, तर जडेजाची खेळी 86 या धावसंख्येवर संपली.

दुसऱ्या डावात भारताचे वर्चस्व कायम राहिले. बुमराहने विकेटची सुरुवात केली, तर आकाश दीपने एका षटकात दोन विकेट्स घेतल्या. सिराजनेही चांगली सुरूवात केली. तत्पूर्वी सिराजने झाकीर हसनविरोधात जोरदार अपील केले होते. सिराजला पूर्ण विश्वास होता की त्याने फलंदाजाला एलबीडब्ल्यू केले. पण मैदानावरील अंपायर त्याच्या आव्हानाशी सहमत नव्हता. यानंतर सिराजने कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) डीआरएस घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यष्टीरक्षक पंतशी बोलल्यानंतर रोहितने डीआरएस घेतला नाही.

सिराजचा चेंडू हसनच्या पॅडला लागला होता. रोहितने यष्टीरक्षक पंतशी जे काही बोलले ते स्टंप माईकवर ऐकू आले. रोहितने विचारले, चेंडू वर आहे का? नाही? बाहेर येत आहे. पण पंतने दिलेल्या उत्तराच्या आधारे रोहितने हा निर्णय घेतला. मात्र, काही वेळाने रिप्ले मोठ्या पडद्यावर दाखवला असता हसन एलबीडब्ल्यू झाला होता. यानंतर सिराजची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रिप्लेनंतर सिराजची प्रतिक्रिया पाहून रोहितच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने माफी मागण्यासाठी हात वर केला. पंतनेही तेच केले. सिराज मात्र निराश झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) 2 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. सिराजने कर्णधार शांतोला कोहलीच्या हातामध्ये झेलबाद केले, तर नाहिद राणाला क्लीन बोल्ड केले आणि तंबूत पाठवले.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियानं वाजवला बांगलादेशचा बँड, दोन सेशन्समध्ये संपूर्ण टीम ऑलआऊट
जसप्रीत बुमराहचा आणखी एक विक्रम; झहीर खान, कपिल देव, मोहम्मद शमीच्या खास क्लबमध्ये एंट्री
वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---