भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीग या टी20 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेने प्रसिद्धीचे अनेक उच्चांक मोडले आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा काही नियम वेगळे वापरले जात आहे. त्या नियमांचा संघ पहिल्या दोन्ही सामन्यात वापर करताना दिसले. आता तेच नियम इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्ये देखील वापरण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
वुमेन्स प्रिमियर लीगमधील काही नियम वेगळे असलेले दिसून येतात. या स्पर्धेत उभय संघ वाईड चेंडू अथवा नो बॉलसाठी रिव्ह्यू मागू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये वाईड अथवा नो बॉलसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागता येत नाही. वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर ही वाईड चेंडूसाठी रिव्ह्यू घेताना दिसली. तर, दुसऱ्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने नो बॉलसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती.
आयपीएलमध्ये अनेकदा नो बॉलमूळे मोठे वाद पहायला मिळाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा 2019 आयपीएलवेळी वादग्रस्त निर्णयाच्या विरोधात थेट मैदानात चालून आला होता. तर, 2022 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध नो बॉलचा एक वादग्रस्त निर्णय दिला गेल्याने दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने आपल्या फलंदाजांना माघारी येण्याची सूचना केली होती. तसेच, काही वेळा वाईड चेंडूचे निर्णय देखील संदिग्ध असतात.
याच कारणांमुळे अनेक चाहते आयपीएलमध्ये हा नियम सुरू करण्याची मागणी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबतची सूचना केली.
(Fans Want No Ball Wide Ball Review In IPL Like
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश