जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग स्पर्धा, इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा युएईमध्ये पार पडणार आहे. दरम्यान चाहते गेल्या काही महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगभरात कोरोनाचे सावट असताना चाहत्यांना मैदानात येऊन सामना पाहण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाची भिती पाहता इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा देखील भारताबाहेर खेळवण्यात येत आहे. दरम्यान आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय आणि युएई सरकारने मिळून क्रिकेट चाहत्यांना आंनदांची बातमी दिली आहे.
गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती दिली जात नाहीये. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी क्रिकेट चाहत्यांना मैदानात येऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
न्यूज इजेंसी आययएनएसच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी चाहत्यांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती दिली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि संयुक्त अरब अमिरात सरकारने मिळून हा निर्णय घेतला आहे. ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लस टोचून घेतल्या असतील त्यांना मैदानात प्रवेश दिला जाईल.
यापूर्वी गल्फ न्यूजसोबत बोलताना आयपीएल आयोजनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, “बीसीसीआय आणि युएई सरकार यांच्यात प्रेक्षकांना मैदानात येऊ देण्याचा विचार सुरू आहे. युएई क्रिकेट बोर्ड सतत कोरोनाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करून आहे.”
जर आयपीएल २०२१ स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला तर येत्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत देखील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित हंगामातील सामने संपल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. जर प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला तर किती टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल? याबाबत आयसीसी लवकरच निर्णय घेऊ शकते.
दरम्यान यूएईचे महासचिव मुबशिर उस्मानी यांनी म्हटले होते की, “बोर्ड युएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल की, सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कुठले नियम असायला हवे. आमची अशी इच्छा आहे की, हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त चाहत्यांनी यूएईमध्ये यावे.”
महत्त्वाच्या बातम्या-
मिस्टर अन् मिसेस कोहलीला दुबईतील हॉटेलकडून ‘चॉकलेटी सरप्राईज’, खास वेलकमने अनुष्का खुश
स्वागत आहे! सचिन पोहचला युएईत, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह मुलगा अर्जूनलाही देईल ट्रेनिंग