---Advertisement---

सुपरमॅनलाही मागे टाकणारी चपळता दाखवत राशिद खानने पकडला ‘कॅच ऑफ द इअर’, ‘हा’ व्हिडिओ तुम्ही सतत पाहाल

On: रविवार, मे 7, 2023 6:56 PM
Rashid-Khan
---Advertisement---

जगभरात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. त्यातील क्वचितच खेळाडू हे गोलंदाजी, फलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात स्वत:ला सिद्ध करून दाखवतात. या तिन्ही विभागात स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा दिग्गज राशिद खान याचाही समावेश आहे. राशिद सध्या आयपीएल 2023मध्ये गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. संघाच्या 10व्या आणि स्पर्धेच्या 51व्या सामन्यात चपळाई दाखवत राशिद खानने अफलातून झेल पकडला. आता त्याने पकडलेल्या झेलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून सतत पाहिला जात आहे.

झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील 9वे षटक गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा (Mohit Sharma) टाकत होता. तसेच, यावेळी लखनऊचा सलामीवीर काईल मेयर्स (Kyle Mayers) स्ट्राईकवर होता. मोहितने पहिलाच चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. यावर मेयर्सने हुक शॉट मारला. मात्र, चेंडू सीमारेषेपर्यंतचे अंतर कापू शकला नाही. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जात असलेला हा चेंडू झेलण्यासाठी राशिद खान (Rashid Khan) धावत आला आणि त्याने कठीण झेल घेतला. राशिदच्या या झेलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

राशिदने झेल घेतल्यामुळे मेयर्सला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 32 चेंडूत 48 धावा करून तंबूत परतला. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचाही समावेश होता.

सामन्याचा आढावा
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी यावेळी निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 227 धावा केल्या आणि लखनऊला 228 धावांचे आव्हान दिले. लखनऊकडून यावेळी मोहसिन खान आणि आवेश खान यांनाच प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. लखनऊकडून फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्यात 81 धावांची भागीदारी झाली. मात्र, मेयर्सची विकेट पडल्यानंतर लखनऊचा डाव पुन्हा थंड पडला. 14व्या षटकापर्यंत लखनऊ संघाला 2 विकेट्स गमावत 121 धावा करता आल्या. ((fantastic catch by rashid khan in gt vs lsg match ipl 2023))

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शतक ठोकण्याचा विचार डोक्यात होता, पण…’, सेंच्युरी हुकल्यानंतर गिलची रोखठोक प्रतिक्रिया; लगेच वाचा
‘देशासाठी फक्त 11 जणच खेळू शकतात…’, आयपीएलदरम्यान रवी शास्त्रींचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---