मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोमवारी (१८ एप्रिल) आयपीएलच्या १५व्या हंगामातील ३०वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ बनवता येईल, हे पाहूया…
राजस्थानने (Rajasthan Royals) या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामने जिंकलेत, तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसलाय. दुसरीकडे, कोलकाताने (Kolkata Knight Riders) या हंगामात आतापर्यंत ६ सामने खेळलेत, त्यातील ३ सामने त्यांनी जिंकलेत आणि उर्वरित ३ सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. हे दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतील.
या खेळाडूंवर असेल नजर
राजस्थान संघ या हंगामात दमदार प्रदर्शन करत आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि कुलदीप सेन या गोलंदाजांवर नजर असेल. दुसरीकडे कोलकाता संघात व्यंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स चांगला खेळ दाखवत आहेत. तसेच गोलंदाज सुनील नारायण, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती हेदेखील की प्लेअर्स ठरू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
राजस्थान रॉयल्स
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल
कोलकाता नाईट रायडर्स
ऍरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, सुनील नारायण, अमन खान, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
अशी बनवू शकता ड्रीम ११
उभय संघाच्या ड्रीम ११ बद्दल बोलायचे (Dream 11) झाल्यास, यष्टीरक्षक म्हणून आपण संघात जोस बटलरला संधी देऊ शकतो. बटलर यष्टीरक्षणासोबतच फलंदाजीतही आपला दम दाखवू शकतो. यानंतर फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर आणि देवदत्त पडिक्कल यांना संघात सामील करू शकतो. याव्यतिरिक्त अष्टपैलू म्हणून आपण आंद्रे रसेल, पॅट कमिन्स आणि रियान पराग यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. ड्रीम ११ मध्ये युझवेंद्र चहल, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण हे गोलंदाज उजवे ठरू शकतील.
या ड्रीम ११ चा कर्णधार म्हणून तुम्ही आंद्रे रसेलवर बोली लावू शकता, तर युझवेंद्र चहलच्या खांद्यावर तुम्ही उपकर्णधाराची जबाबदारी सोपवू शकता. या दोन्ही खेळाडूंनी मागच्या सामन्यात आपापल्या संघांसाठी शानदार प्रदर्शन केले आहे.
कर्णधार- आंद्रे रसेल
उपकर्णधार- युझवेंद्र चहल
फलंदाज- शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, देवदत्त पडिक्कल
गोलंदाज- युझवेंद्र चहल, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण
अष्टपैलू- आंद्रे रसेल, रियान पराग, पॅट कमिन्स
यष्टीरक्षक- जोस बटलर
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो