दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. सामन्यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर १७३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून पूर्ण केले आणि आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. दरम्यान स्टेडियमच्या बाहेर जात असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना निरोप देण्यात आला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे ६ हंगाम उलटून गेल्यानंतर ७ व्या हंगामात ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे या विजयाचा जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये डान्स केला. तसेच मैदानातून हॉटेलच्या दिशेने जात असताना देखील एक खास सेलिब्रेशन करण्यात आले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून बाहेर येत आहेत. चाहत्यांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला आहे. तसेच कर्णधार आरोन फिंच सर्वात पुढे आयसीसी टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाहेर येतो. त्यानंतर एका पाठोपाठ एक ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टेडियममधून बाहेर येतात.
परंतु खेळाडूंच्या निरोपासाठी खास सोय करण्यात आली होती. ती म्हणजे बँडची सोय. दोन्ही बाजूने वादक उभे होते आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टेडियममधून बाहेर येत असताना या बँडवर जल्लोषात नाचत होते. ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंचा हा डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच शेवटी मार्कस स्टोइनिसने केलेला डान्स चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय.
https://twitter.com/abcsport/status/1460027535865966594?t=FAcdiVDZw56Pje870SsVpA&s=19
तसेच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये डान्स करताना दिसून येत आहे. ज्यामध्ये ॲडम झांपा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइमिस मस्ती करताना दिसून येत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने चक्क शूजमध्ये बियर ओतली आणि प्यायला सुरू केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅक्सवेलचा मॅच विनिंग चौकार अन् वॉर्नरने स्मिथला मारली मिठी, पाहा ऑस्ट्रेलियाचा विनिंग मूमेंट
दुबई स्टेडियम, दुसऱ्यांदा फलंदाजी अन् विजेत्या संघाचे आहे खास कनेक्शन, ऑस्ट्रेलियालाही झाला फायदा






