---Advertisement---

जा माफ केलं! संधी असतानाही चाहरने दाखवला मनाचा मोठेपणा, आफ्रिकन फलंदाजाला दिले जीवदान

Deepak-Chahar
---Advertisement---

मंकडिंग हा विषय निघाला की, सर्वांच्या भुवया उंचावतात. कुणी याला पाठिंबा देतं, तर कुणी याला विरोध करतं. मात्र, जे गोलंदाज मंकडिंग न करता नॉन स्ट्रायकर खेळाडूंना जीवदान देतात, त्यांची चांगलीच चर्चा रंगते. अशीच चर्चा रंगलीये दीपक चाहर याची. मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्याच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना इंदोर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यादरम्यान पाहुण्या संघाचे खेळाडू दमदार फटकेबाजी करत असताना चाहरने एका फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्नही केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

दीपक चाहरचा दक्षिण आफ्रिकी फलंदाजाला मंकडिंगने बाद करण्याचा प्रयत्न
झालं असं की, दक्षिण आफ्रिका संघाच्या डावात भारताकडून 16वे षटक टाकण्यासाठी दीपक चाहर (Deepak Chahar) आला होता. यावेळी रायली रूसो (Rilee Rossouw) आणि ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) हे खेळपट्टीवर उपस्थित होते. अशात जेव्हा चाहर त्याच्या षटकातील पहिला चेंडू टाकत होता, तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेला स्टब्स खेळपट्टी ओलांडताना दिसला. त्यावेळी चाहरने चपळतेने त्याला मंकडिंग (Deepak Chahar Mankading) याद्वारे बाद करण्याचा प्रयत्न केला. चाहर चेंडू फेकण्यापूर्वीच स्टब्स क्रीझ सोडून पुढे गेला होता. त्यामुळे चाहर मध्येच थांबला आणि त्याने मंकड करू लागला.

मात्र, चाहरने खिलाडूवृत्ती दाखवली आणि स्टब्सला चेतावणी दिली. या पूर्ण घटनेनंतर चाहरसोबतच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील हसू लागला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1577309967551721472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1577309967551721472%7Ctwgr%5E3bf6733fe4210d6472d33792f52a8aed699cea6e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fdeepak-chahar-attempted-mankad%2F

https://twitter.com/ramvish93296061/status/1577315337388711936

https://twitter.com/RibsGully/status/1577314205610696707

दक्षिण आफ्रिकेचे भारतापुढे 228 धावांचे आव्हान
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजीला उतरताच भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. रायली रूसो आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) यांनी जबरदस्त फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात दिली. त्यांनी 89 धावांची भागीदारी रचली. पुढे रायलीने भारताविरुद्ध टी20 कारकीर्दीतील आपले पहिले शतकही झळकावले. त्याने 48 चेंडूत 208.33च्या 100 धावांची अविश्वसनीय खेळी केली. या धावा करताना त्याने 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. डी कॉकनेही अर्धशतक पूर्ण करत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. या खेळींमुळे दक्षिण आफ्रिका संघाने 3 विकेट्स गमावत 227 धावांचा भलामोठा डोंगर उभारला आणि भारताला 228 धावांचे आव्हान दिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजांची पुन्हा धुलाई! रुसोच्या तुफानी शतकाने दक्षिण आफ्रिका 3 बाद 227
टीम इंडियाची पिसे काढत डी कॉकने रचले विक्रमांचे इमले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---