भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने क्रिकेट इतिहासात अनेक शानदार विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या ३ ट्रॉफी जिंकल्या आहेत. यामध्ये २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे.
असे असले तरी, ‘कॅप्टनकूल’ने जुलै २०१९पासून क्रिकेट खेळले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा चालू होत्या. अशात १५ ऑगस्टला अचानक धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा करत सर्वांना चकित केले. आता धोनीच्या निवृत्तीला जवळपास २ आठवडे झाले आहेत. तरीही त्याच्या चर्चांना विराम लागलेला नाही.
धोनीच्या निवृत्तीविषयी त्याचा खास मित्र आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “एमएस धोनी टी२० विश्वचषकासारख्या मोठ्या टूर्नामेंटची वाट पाहात होता आणि ही टूर्नामेंट पुढे ढकलण्यात आली. त्याला गेल्या अनेक दिवसांपासून फलंदाजी करण्याची जास्त संधी मिळाली नव्हती. सोबतच त्याची भूमिका पुर्वीप्रमाणे एका शानदार साामना फिनिशरसारखी दिसत नव्हती. याच कारणामुळे त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.” RP Singh Talks About MS Dhoni Retirement Real Reason
“धोनीची फिटनेस अजूनही जबरदस्त आहे. जर त्याच्या आयपीएलमधील विक्रमांना बाजूला ठेवले तर त्याला गेल्या १-२ वर्षांपासून नीट फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला २०१९सालच्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती, पण संघ व्यवस्थापकांनी त्याला खालच्या फळीत फलंदाजी करायला सांगितली. त्यामुळे उपांत्य सामन्यात त्याला हवी तशी फलंदाजी करायला मिळाली नाही. जर त्याला खालच्या फळीत फलंदाजीला पाठवण्याऐवजी लवकर पाठवले असते, तर चांगले झाले असते,” असे पुढे बोलताना आरपी सिंग म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –