कसोटी क्रिकेटमध्ये सतत धावा करणं कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असतं. छोटीशी चूकही गोलंदाजासाठी संधी बनते. असं असूनही आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फॉरमॅटवर राज्य करणारे अनेक फलंदाज आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिननं आपल्या कारकिर्दीत 15,921 कसोटी धावा केल्या आहेत. कसोटी फॉरमॅटमध्ये 14 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याचा हा विक्रम मोडणं खूप कठीण आहे, मात्र इंग्लंडचा जो रुट त्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे.
जो रुटनं बर्मिंगहॅम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत कारकिर्दीतील 12,000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्यानं वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा (11953) याला मागे टाकलं. लाराला मागे टाकण्यासोबतच जो रुटनं सर्वात जलद 12,000 कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवलं आहे. या बातमीत आम्ही अशा टॉप 3 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.
(3) रिकी पाँटिंग – ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग हा एक उत्तम कर्णधार असण्यासोबतच एक धडाकेबाज फलंदाजही होता. पाँटिंगनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो कसोटीत सर्वाधिक धावा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. पाँटिंगच्या नावावर कसोटीमध्ये 13,378 धावा आहेत. पाँटिंगनं 146 सामन्यांमध्ये 12,000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. 2010 मध्ये लीड्समध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं ही कामगिरी केली होती.
(2) जो रुट – कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर असलेल्या जो रुटचं नावही या यादीत सामील झालं आहे. रुटनं कारकिर्दीतील 143व्या कसोटी सामन्यात 12,000 धावा पूर्ण केल्या. यासह तो 12,000 कसोटी धावा अकरणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला.
(1) कुमार संगकारा – श्रीलंकेचा कुमार संगकारा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर असला तरी सर्वात जलद 12000 धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. संगकारानं अवघ्या 130 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. 2015 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्यानं हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
हेही वाचा –
चेहऱ्यावर बॉल लागला, रक्त निघालं, तरीही हार मानली नाही; या भारतीय गोलंदाजाच्या धैर्याला तोड नाही!
जो रुटचा धमाका, कसोटीमध्ये ब्रायन लाराचा विक्रम मोडला; आता बारी सचिनची!
आश्चर्यकारक! टी20 आणि एकदिवसीय क्रिकेट गाजवलेले दिग्गज खेळाडू, कसोटी क्रिकेटपासून अजूनही वंचित