आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९५ धावांचा डोंगर उभा केला. यादरम्यान मुंबईकडून फलंदाजी करताना स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने एक कारनामा केला आहे.
मुंबईचे पहिले ४ विकेट्स पडल्यानंतर १४ व्या षटकात फलंदाजीला पंड्या आला होता. त्याने सुरुवातीला सावकाश सुरुवात केली. परंतु डाव जसा पुढे सरकला तशी त्याने आपली फटकेबाजी सुरू केली. यादरम्यान त्याने केवळ २१ चेंडूत ६० धावांची खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्या ८ चेंडूत त्याने सुरुवातीला केवळ ९ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या १२ चेंडूत त्याने ५२ धावा कुटल्या.
यासह त्याने मुंबईसाठी सर्वात जलद २० चेंडूत अर्धशतक ठोकले. असा कारनामा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी सर्वात कमी चेंडूत मुंबईसाठी जलद अर्धशतक ठोकण्याचा कारनामा स्वत: हार्दिक पंड्याच्या नावावर आहे. त्याने केवळ १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
त्यासोबतच ईशान किशन (१७), आणि कायरन पोलार्डने (१७) चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. त्यानंतर हरभजन सिंगने १९ चेंडूत मुंबईसाठी जलद अर्धशतक ठोकले होते.
मुंबईसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज
१७ चेंडूत- हार्दिक पंड्या
१७ चेंडूत- ईशान किशन
१७ चेंडूत- कायरन पोलार्ड
१९ चेंडूत- हरभजन सिंग
२० चेंडूत- कायरन पोलार्ड
२० चेंडूत- कायरन पोलार्ड
२०* चेंडूत- हार्दिक पंड्या
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
-फिर से ‘हिट मॅन’! राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठोकताच रोहितच्या नावावर होणार मोठा विक्रम
-विक्रमवीर पांडे! हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकत मनीषने केला ‘खास’ विक्रम, वाचा सविस्तर
ट्रेंडिंग लेख-
-चौकारांशिवाय अर्धशतक…!! आयपीएलमध्ये या ५ फलंदाजांनी केलाय हा कारनामा
-आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी