बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताकडून डावाची सुरुवात करताना सलामीवीर अपयशी ठरले. मात्र, तिसऱ्या वनडेत सर्वच चित्र पालटल्याचे दिसले. शिखर धवन जरी लवकर बाद झाला असला, तरीही दुसरा सलामीवीर ईशान किशन हा भारताची धावसंख्या 300 धावांच्या पार करूनच बाद झाला. यादरम्यान किशनने द्विशतक झळकावले. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. या विक्रमात त्याने ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही मागे टाकले. चला तर जाणून घेऊया ईशानने कोणता विक्रम रचलाय…
ईशान किशनचे द्विशतक
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) 3 धावांवर बाद झाल्यानंतर 24 वर्षीय ईशान किशन (Ishan Kishan) याने डाव सांभाळला. त्याने विराटसोबत तब्बल 290 धावांची भागीदारी रचली. यात किशनच्या 199 आणि विराटच्या 85 धावांचा समावेश होता. किशनने पुढे 126 चेंडूत आपले द्विशतक साकारले. त्याने या खेळीत 131 चेंडूंचा सामना करताना 210 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 10 षटकार आणि 24 चौकारही मारले.
Innings Break!
Sensational batting display from #TeamIndia 👌 👌
A cracking 210 for @ishankishan51 ⚡️
A fine 113 for @imVkohli 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqtZJsM#BANvIND pic.twitter.com/UhTce3aHu4
— BCCI (@BCCI) December 10, 2022
या द्विशतकासह किशनच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो वनडेत सर्वात जलद द्विशतक करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. या विक्रमात त्याने ख्रिस गेल (Chris Gayle) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. यापूर्वी हा विक्रम गेलच्या नावावर होता. त्याने 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 138 चेंडूत द्विशतक ठोकले होते. तसेच, यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग असून त्याने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 140 चेंडूत द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली होती. (Fastest double century in men’s ODIs ishan top in the list)
वनडेत जलद द्विशतक करणारे खेळाडू
126 चेंडूत- ईशान किशन, विरुद्ध- बांगलादेश (2022)*
138 चेंडूत – ख्रिस गेल, विरुद्ध- झिम्बाब्वे (2015)
140 चेंडूत- वीरेंद्र सेहवाग, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2011)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार सामन्यात 4 वेगवेगळ्या सलामी जोड्या, भारतीय संघातील प्रयोगाला पूर्णविराम लागणार तरी कधी?
आहा कडकच ना! ईशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंडही फिदा, पोस्ट वेधतेय सर्वांचे लक्ष