आयपीएल 2021 स्पर्धा आता खऱ्या अर्थाने रंगत चालेली दिसत आहे. प्रत्येक सामना उत्कंठा वर्धक होत असून खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. दिनांक 1 मे रोजी कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणाऱ्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये झालेल्या सामन्यात अशाच प्रकारची कामगिरी बघायला मिळाली. या सामन्यात चेन्नईचा खेळाडू अंबाती रायडूने आपल्या अर्धशतकी खेळीद्वारे एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रायडूने मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना केवळ 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान रायडूने चेन्नईकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असेलेल्या एमएस धोनीची बरोबरी केली आहे.
चेन्नईकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना प्रथम क्रमांकावर आहे. रैनाने 2014 साली पंजाब विरुद्ध केवळ 16 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. चेन्नईकडून जलद अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत द्वितीय क्रमांकावर कर्णधार धोनी येतो. धोनीने 2012 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
मुंबई इंडियन्सविरुद्ध रायडूने आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान नेत्रदीपक फटकेबाजी केली. त्याने 27 चेंडू 4 चौकार व 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 77 धावांची शानदार खेळी केली. एक वेळ अडचणीत सापडलेल्या चेन्नई संघासाठी रायडू खऱ्या अर्थाने तारक ठरला. रायडूच्या या आक्रमक खेळीमुळे चेन्नईला निर्धारित 20 षटकात 4 बाद 218 धावांची डोंगरा एवढी धावसंख्या उभारण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
पंड्या बंधूंचा कौतुकास्पद निर्णय; भारतातील ग्रामीण भागात करणार ‘इतक्या’ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत
रैनाने सार्थ केले ‘मिस्टर आयपीएल’ नाव; मिळवले धोनी, रोहितच्या पंक्तीत स्थान
गेलला मिळाली राणी! आनंदात करू लागला डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल