---Advertisement---

पंड्या बंधूंचा कौतुकास्पद निर्णय; भारतातील ग्रामीण भागात करणार ‘इतक्या’ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत

On: शनिवार, मे 1, 2021 10:06 PM
---Advertisement---

संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व ब्रेट ली यांनी भारताला आर्थिक निधी देऊन मदत केली आहे. तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 1 कोटींची मदत केली होती. तसेच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील मदतीचा हात पुढे केला होता. यादरम्यानच बातमी समोर येत असून हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूंनी देखील कोरोना काळात मदत करत आपला खारीचा वाटा उचलला आहे.

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकात ऑक्सिजनची सध्या नितांत गरज भासत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन निर्मिती करण्यामागे आरोग्य यंत्रणेचा मोठा कल दिसून येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची देखील आवश्यकता आहे. ऑक्सिजनच्या अभावे अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे सरकारने देखील याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पंड्या बंधूं 200 ऑक्सीजन कॉंन्संट्रेटरची मदत करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

पंड्या बंधूंनी केलेली ही सर्व मदत देशातील ग्रामीण भागात वापरली जाणार आहे. हार्दिकने ही सर्व माहिती चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी दिली आहे.

पंड्या बंधू सध्या आयपीएल हंगामात मुंबई इडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मुंबई संघाकडून दोघांनाही या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या समर्थकांना आशा असेल की दोघेही आगामी सामन्यात उत्तम कामगिरी करतील.

महत्त्वाच्या बातम्या –

रैनाने सार्थ केले ‘मिस्टर आयपीएल’ नाव; मिळवले धोनी, रोहितच्या पंक्तीत स्थान

रोहितचा ‘हिट’ कारनामा! टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

बीसीसीआयने या खेळाडूला दिले नाही २ वर्षांपासुन वेतन; भाऊ आहे कोरोना पॉझिटिव्ह, तर आईलाही श्वसनाचा त्रास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---