---Advertisement---

अफलातून कामगिरी! कसोटीतील ‘या’ विक्रमात मयंक गावसकरांच्याही पुढे

On: शनिवार, डिसेंबर 19, 2020 10:17 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटीतील पहिला सामना ऍडलेड येथे खेळवला जात आहे. आज या सामन्यातील तिसरा दिवस आहे. या सामन्यात भारतीय संघ तिसऱ्या दिवशी १० षटकांनंतर ६८ धावांच्या आघाडीवर आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ तंबूत परतला असून मयंक अगरवाल आणि जसप्रीत बुमराह खेळत आहेत. यादरम्यान मयंकने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांना मागे टाकले आहे.

तिसऱ्या दिवशी मयंकने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क टाकत असलेल्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला. आणि ९ धावा केल्या. यासोबत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १००० धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी त्याने अवघ्या १९ डावांमध्ये पूर्ण केली. यामध्ये ३ शतकांचाही समावेश आहे.

या विक्रमात त्याने गावसकर यांनाही मागे टाकले आहे. गावसकर यांनी २१ डावांमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील १००० धावांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संजय मांजरेकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांनी २३ डावांमध्ये, तर वीरेंद्र सेहवागने २४ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

कसोटीत सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम विनोद कांबळी यांच्या नावावर आहे. त्यांनी अवघ्या १४ डावांमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यासोबतच दुसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा असून त्याने १८ कसोटी डावांमध्ये जलद १००० धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारे भारतीय खेळाडू

१४ डाव- विनोद कांबळी
१८ डाव- चेतेश्वर पुजारा
१९ डाव- मयंक अगरवाल*
२१ डाव- सुनील गावसकर
२३ डाव- संजय मांजरेकर
२३ डाव- राहुल द्रविड
२३ डाव- सौरव गांगुली
२३ डाव- वीरेंद्र सेहवाग

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉची खराब फिल्डिंग पाहून भारतीय कर्णधाराचा राग अनावर, मैदानावरच दिली शिवी

“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला

विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---