मँचेस्टर। गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात भारताने विंडीज विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवून या स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात मोहम्मद शमीने 6.2 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्स घेउन महत्त्वाचा वाटा उचलला.
शमीने या सामन्यात ख्रिस गेल, शाय होप, शिमरॉन हेटमेयर आणि ओशान थॉमसला बाद केले. याबरोबर शमीने एक खास विश्वविक्रम केला आहे. त्याच्या विश्वचषकात 25 विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.
तसेच शमी विश्वचषकात सर्वात जलद 25 विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने विश्वचषकातील 9 व्या सामन्यात खेळाताना 25 विकेट्स घेतल्या आहेत.
हा पराक्रम करताना त्याने मिशेल स्टार्कला मागे टाकले आहे. स्टार्कने विश्वचषकातील 10 व्या सामन्यात खेळताना 25 विकेट्सचा टप्पा पार केला होता.
शमीने 2015 च्या विश्वचषकात खेळताना 7 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर 2019 च्या विश्वचषकात त्याला भुवनेश्वर कुमार दुखापग्रस्त झाल्याने अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने दोन्ही सामन्यात प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हॅट्रिकही घेतली होती.
विश्वचषकात जलद 25 विकेट घेणारे गोलंदाज –
9 सामने- मोहम्मद शमी
10 सामने- मिशेल स्टार्क
11 सामने- ट्रेंट बोल्ट
11 सामने- इम्रान ताहीर
11 सामने- टीम साऊदी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयसीसीने श्रीलंकेला दिली ‘ही’ लकी जर्सी घालण्याची परवानगी, जाणून घ्या कारण
–विंडीज विरुद्धच्या विजयानंतरही सेहवागने केली भारतीय फलंदाजांवर टीका, जाणून घ्या कारण
–विजयाच्या आनंदात कर्णधार कोहलीने घेतली चाहत्यांबरोबर सेल्फी, पहा व्हिडिओ






