---Advertisement---

टीम इंडियाचा ‘सुपर फॅन’ इंग्लंडला मिळवून देणार ‘फतेह’

FATEH SINGH
---Advertisement---

एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाचा (u19 world cup 2022) अंतिम सामना शनिवारी (५ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि इंग्लंडचे युवा संघ आमने सामने असतील. १९ वर्षाखालील इंग्लंडच्या या संघात एक खेळाडू असा आहे, जो पाच वर्षांपूर्वी २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला प्रोत्साहन देत होता. परंतु, आता भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या खेळाडूचे नाव फतेह सिंग (fateh singh) आहे.

२०१७ साली खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी फतेह सिंगने आयसीसीची एक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकिट मिळाले होते. त्यावेळी तो भारताचे समर्थन करत होता. फतेह सिंग आज जरी इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व करत असला, तरी त्याचे कुटुंब मुळचे भारतीय आहे. विश्वचषकात इंग्लंडसाठी खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये फतेहने ३.१५ च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली आहे, जी सर्वात कमी आहे.

फतेह सिंग इंग्लंडचा काउंटी संघ नॉटिंघमशायरसाठी खेळतो. त्याने ११ वर्षाखालील क्रिकेटमध्ये नॉटिंघमशायरचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्याला १३ वर्षाखालील संघाचा कर्णधार बनवले गेले होते. कारकिर्दीच्या सुरुवातील तो एक वेगवान गोलंदाज होता. मात्र, नंतर प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून तो फिरकी गोलंदाज बनला. दरम्यान, फतेहला २०१५ साली एलोपेसिया यूनिवर्सलिस नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्याच्या अंगावरील सर्व केस गळून गेले. मात्र, त्याव्यतिरिक्त त्याच्या शरीरावर इतर कसलाही परिणाम झाला नाही. यासंदर्भात सांगताना तो म्हणाला की, या आजाराने शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला नाही. केवळ केस गळाले. सुरुवातीला हे स्वीकार करणे कठीण होते, पण आता काहीच अडचण नाहीय.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---