आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार आहे. महिला टी20 विश्वचषकाचे सामने 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवले जाणार आहेत. असे असले तरीही, यजमानपदाचे अधिकार बांगलादेशकडेच राहतील, ज्यामुळे त्यांनाही महसूलाचा वाटा मिळेल. याआधी ही स्पर्धा फक्त बांगलादेशातच होणार होती, मात्र तेथील हिंसाचारामुळे स्पर्धेचे आयोजन धोक्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तान महिला संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
या खेळाडूकडून कर्णधारपद हिसकावून घेतले
2024 च्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची नियुक्तीही केली आहे. या संघाचे नेतृत्त्वपद वेगवान गोलंदाज फातिमा सना हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. यापूर्वी फातिमाने दोन वनडे सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. पण आता ती पहिल्यांदाच टी20 संघाची धुरा सांभाळणार आहे. फातिमाने अष्टपैलू निदा दारची जागा घेतली आहे.
पाकिस्तानच्या महिला संघात समाविष्ट असलेल्या 15 पैकी 10 खेळाडू 2023 मध्ये झालेल्या महिला टी20 विश्वचषकातही संघाचा भाग होत्या. यामध्ये आलिया रियाझ, मुनिबा अली, नशरा संधू, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, तुबा हसन, सदफ शमास, निदा दार आणि फातिमा सना यांचा समावेश आहे. तर 15 सदस्यीय संघातील डावखुरी फिरकीपटू सादियाची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. तसेच डावखुरी वेगवान गोलंदाज तस्मिया रुबाबही संघाचा भाग आहे. तस्मियाने अद्याप टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
.@imfatimasana named Pakistan captain for ICC Women’s T20 World Cup 2024 🚨
Our squad for the marquee event 🇵🇰#BackOurGirls pic.twitter.com/NWoF6RmyVH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2024
पाकिस्तान भारताच्या गटात आहे
यष्टीरक्षक फलंदाज नाझिहा अल्वीला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. तथापि, ती प्रवासी राखीव खेळाडू म्हणून यूएईला जाईल. रामीन शमीम आणि उम्म-ए-हानी यांना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे. महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेसह अ गटात ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
महिला टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली (विकेटकीपर), नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसवर अवलंबून), सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.
प्रवासी राखीव: नाझिहा अल्वी (यष्टीरक्षक)
राखीव खेळाडू: रामीन शमीम आणि उम्म-ए-हानी
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातून बाहेर होणार ‘हे’ ३ खेळाडू! आझमचाही समावेश
“माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजले असेल”, निवृत्तीनंतर मुलगा जोरावरबद्दल शिखर धवन भावूक
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या