---Advertisement---

पाकिस्तानी फलंदाजाचे विंडीजविरुद्ध झंझावती शतक; गावसकर, गांगुलीसारख्या दिग्गजांवर ठरला वरचढ

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 10:48 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान संघात किंगस्टनच्या सबीना पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. उभय संघात सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा (२१ ऑगस्ट) खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने ४ बाद २१२ धावांपासून पुढे खेळताना ३०२ धावा फलकावर नोंदवल्या आणि पहिला डाव घोषित केला. पाकिस्तानला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात फलंदाज फवाद आलम याचा मोठा वाटा राहिला. त्याने डावाखेर नाबाद शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे.

पाकिस्तानच्या पहिल्या डावाचा नायक राहिलेल्या फवादने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. वेस्ट इंडिजच्या एकाहून एक सरस गोलंदाजांचा समाचार घेत त्याने २१३ चेंडूंमध्ये नाबाद १२४ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार ठोकले. हे झंझावती शतक फवादच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. यासह ३५ वर्षीय फवाद कसोटीत सर्वात जलद ५ शतके ठोकणारा आशियाई फलंदाज बनला आहे. त्याने २२ कसोटी डावांमध्ये ही विक्रमी कामगिरी केली आहे.

या विक्रमांत त्याने भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. फवादपूर्वी कसोटीत सर्वात जलद ५ शतके करणाऱ्या आशियाई फलंदाजामध्ये चेतेश्वर पुजाराचे नाव अव्वलस्थानी होते. त्याने २४ कसोटी डावांमध्ये ही उपलब्धी मिळवली होती. केवळ पुजाराच नव्हे तर, फवादने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (२५ डाव), सुनिल गावसकर (२५ डाव) आणि विजय हजारे (२६ डाव) यांनाही पिछाडीवर सोडले आहे.

https://www.instagram.com/p/CS45-hZsURJ/?utm_source=ig_web_button_share_sheet

फवादव्यतिरिक्त कर्णधार बाबर आझमनेही ७५ धावा चोपत संघाचा डगमगता डाव सावरला होता. या दोघांव्यतिरिक्त पाकिस्तानचा इतर कोणताही फलंदाज ३५ धावांचा आकडाही ओलांडू शकला नाही. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जेडन सिल्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानच्या ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १४ षटकांतच ३ विकेट्स गमावल्या आहेत. शाहिन आफ्रिदीने त्यातील २ विकेट्स चटकावल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिज संघ ३ बाद ३९ धावांवर आहे. कुमराह बॉनर (१८ धावा) आणि अल्जारी जोसेफ (० धावा) फलंदाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आता प्रशिक्षकांना बनवले जाणार विश्वस्तरीय, एनसीएमध्ये सुरू होणार ‘कार्पोरेट क्लास’

‘गुरुजीं’नी जे ठरवलं ते केलंच! रोहित शर्माला कसोटी फलंदाज बनवण्यात शास्त्रींचा मोठा वाटा

चेतन सकारियाला फ्रँचायझीने विचारला घरचा पत्ता, गोलंदाजाचे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---