पाकिस्तान क्रिकेट संघाच्या एका फलंदाजाने आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे सोडून दिले आहे. हा क्रिकेटपटू दुसरा कोणी नसून फवाद आलम आहे. त्याने अलीकडेच पाकिस्तान संघासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये खेळला होता. तो आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये खेळताना दिसणार आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 15 वर्षे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या फवाद आलमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डापासून फारकत घेतली आहे.
पाकिस्तानी फलंदाज फवाद आलम (Fawad Alam) याला देशासाठी फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने 2007 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सोबत वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच 2009ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, आतापर्यंत तो पाकिस्तानसाठी केवळ 19 कसोटी, 38 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळू शकला आहे. जुलै 2022 मध्ये तो श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. क्रिकबझच्या मते, तो यूएसमध्ये मायनर लीग क्रिकेट टी20 मध्ये खेळताना दिसणार आहे.
फवाद 2020 मध्ये, तब्बल 11 वर्षांनी पाकिस्तानच्या कसोटी संघात परतला होता. त्याने चांगली फलंदाजी करत सलग धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत तो फार काही करू शकला नाही. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे तो 4 डावात केवळ 33 धावा करू शकला. तो क्रिकेटच्या नियमानूसार फलंदाजी करत नसे. या कारणामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली आहे.
याआधी देखिल अनेक पाकिस्तान संघातील खेळाडू यूएसमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत. सामी अस्लम, हम्माद आझम, सैफ बदर आणि मोहम्मद मोहसीन यांसारख्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत आता फवादचे नाव जोडले आहे. या खेळाडूंनी देखील आपल्या पाकिस्तान संघातून बाहेर पडत यूएसमध्ये क्रिकेट खेळ्यास सुरवात केली होती.
फवादची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
फवादने पाकिस्तान संघासाठी खेळाताना 19 कसोटी सामन्यात 5 शतक आणि 2 अर्धशतकासह 1011 धावा केल्या आहेत. तर, वनडेमध्ये त्याने 38 सामने खेळून 966 धावा केल्या आहेत. यात त्याचे 1 शतक आणि 6 अर्धशतक आहेत. फवादने 24 टी20 सामन्यात केवळ 194 धावा केल्या आहेत. (fawad alam quits pakistan cricket and he play in usa)
महत्वाच्या बातम्या-
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल