एफसी गोवाने हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये शनिवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडला पराभवाचा धक्का दिला. नॉर्थ ईस्ट युनायटेडचा हा सलग 10वा पराभव ठरला आहे आणि त्यांच्या प्ले ऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्यात जमा झाल्या आहेत. एडू बेडिया व इकर गौरोत्क्सेना यांनी केलेला प्रत्येकी एक गोल गोवा संघाच्या विजयासाठी पुरेसे ठरले. मागील सामन्याच्या तुलनेत नॉर्थ ईस्ट युनायटेडचा बचाव आजच्या सामन्यात बराच सुधारलेला दिसला, परंतु आक्रमणात ते कमी पडले. 90+4 मिनिटाला नॉर्थ ईस्टला पेनल्टी मिळाली आणि विलमार गिलने त्यावर गोल केला. तरीही एफसी गोवाचा 2-1 असा विजय निश्चित राहिला.
नॉर्थ ईस्ट युनायटेडची यंदाच्या पर्वातील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे आणि हिरो आयएसएलमध्ये मागील 22 सामन्यांत त्यांना क्लीन शीट राखता आली नाही. त्यात एफसी गोवाने 10व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडला धक्का दिला. नोआ सदौईच्या पासवर एडू बेडियाने भन्नाट गोल केला अन् एफसी गोवाने 1-0 अशी आघाडी घेतली. 18व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचूने एफसी गोवाच्या नोआ सदौईला घातक पद्धतीने रोखले. त्याला लाल कार्ड दाखवले जाईल असे अपेक्षित होते, परंतु रेफरीने पिवळे कार्ड दाखवून त्याला ताकीद दिली.
मिर्शादच्या मिचूच्या चुकीमुळे एफसी गोवाला बॉक्स बाहेरून फ्री किक मिळाला. त्यावर नॉर्थ ईस्टच्या खेळाडूंनी बचाव केला, परंतु चेंडू पुन्हा इकर गौरोत्क्सेनाकडे गेला अन् त्याने वेगवान किक मारून गोवाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. नोआ सदौईने 23व्या मिनिटाला टोलवलेला चेंडू गोलपोस्टच्या अगदी बाजूने गेला अन् नॉर्थ ईस्टच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला. 32व्या मिनिटाला कॉर्नवरून आलेल्या चेंडूवर प्रग्यान गोगोईला गोल करण्यापासून गोवाच्या बचावपटूने रोखले. पहिल्या हाफच्या अखेरच्या दहा मिनिटांत नॉर्थ ईस्टचा खेळ अचानक आक्रमक झालेला दिलसा अन् 44व्या मिनिटाला रोमैन फिलिपोटूचा गोल थोडक्यात होण्यापासून वाचला. 45 मिनिटांच्या खेळात एफसी गोवाने वर्चस्व गाजवले अन् 2-0 अशी आघाडी मिळवली.
Another home game, another 3⃣ points 🧡🔥#ForcaGoa #UzzoOnceAgain #FCGNEU #HeroISL pic.twitter.com/rs6qWsdOzI
— FC Goa (@FCGoaOfficial) December 17, 2022
दुसऱ्या हाफमध्ये नॉर्थ ईस्टसाठी 48व्या मिनिटाला अन्वर अलीने गोलचा प्रयत्न केला अन् चेंडू पोस्टच्या अगदी बाजूने बाहेर गेला. एफसी गोवाने आघाडी घेतल्यामुळे आता बचावात्मक खेळावर भर दिला अन् चेंडूवर अधिक काळ ताबा राखताना नॉर्थ ईस्टला गोल करण्यापासून दूर ठेवले. 60व्या मिनिटाला नोआ सदौईचा सुरेख प्रयत्न नॉर्थ ईस्टच्या गोलरक्षकाने तितकाच अप्रतिम पद्धतीने रोखला. नॉर्थ ईस्टलाही गोल करण्यात सातत्याने अपयश येताना दिसले. विलमानर गिल व फिलिपोटू हे चेंडू एफसी गोवाच्या पेनल्टी क्षेत्रात खेळवत होते, पण अंतिम दिशा देण्यात त्यांना यश मिळत नव्हते. 75व्या मिनिटाला सदौईने गोलरक्षकाला चकवले होते, परंतु त्याने टोलावलेला चेंडू पोस्टला लागून माघारी फिरला. सदौईला त्याच्या नशीबावर विश्वासच बसेनासा झाला.
90+4 व्या मिनिटाला अन्वर अलीच्या हाताला चेंडू लागल्याने रेफरीने नॉर्थ ईस्टला पेनल्टी दिली आणि त्यावर विलमार गिलने गोल करून पिछाडी कमी केली, परंतु पराभव टाळू नाही शकले. एफसी गोवाने आघाडी कायम राखताना 2-1 असा विजय पक्का केला. मागील सामन्यात 7-3 अशी हार मानणाऱ्या नॉर्थ ईस्टचा बचाव या सामन्यात चांगला झाला.
निकाल : एफसी गोवा 2 ( एडू बेडिया 10 मि., इकर गौरोत्क्सेना 20 मि. ) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी 1 ( विलमार गिल 90+4 मि. ( पेनल्टी) ).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 505 मिनिटे फलंदाजी अन् 99 धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर
बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव