मेलबर्न । १९ ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झरलँडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने मार्तोन फुकडोविकसला उपउपांत्यपूर्व फेरीत ६-४, ७-६, ६-२ असे पराभूत केले.
२ तास १ मिनिट चाललेल्या फेडररने मार्तोन फुकडोविकसला कोणतीही संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये त्याची सर्व्हिस भेदत फेडररने ६-४ असा जिंकला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सेटमध्ये फुकडोविकसने चांगली झुंज दिली. या सेटमध्ये टायब्रेकर गेलेला सेट फेडररने ७-६ (७-३) असा जिंकला.
https://twitter.com/Maha_Sports/status/955328949692674049
शेवटच्या सेटमध्ये कोणतीही संधी न देता फेडररने ६-२ असा सेट जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात फेडररने केलेले विक्रम
-१९७७ नंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा फेडरर सर्वात वयस्कर खेळाडू
-रॉजर फेडररने विक्रम १४व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे
-एकही सेट न गमावता रॉजर फेडररने २१व्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
-रॉजर फेडररने ५२व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे
-ओपन इरामध्ये ९० पेक्षा जास्त वेळा दोन ग्रँडस्लॅम स्पर्धात सामने जिंकणारा फेडरर हा एकमेव खेळाडू (विम्बल्डन ९१, ऑस्ट्रेलियन ओपन ९१)
-फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ९१ सामने जिंकले आहेत तर १३ पराभवांना त्याला येथे सामोरे जावे लागले आहे.