---Advertisement---

पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी

On: सोमवार, मे 29, 2023 8:45 AM
---Advertisement---

मागील जवळपास दोन महिन्यांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळण्यात येईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. मात्र, रविवारी सामना न झाल्याने अनेक प्रेक्षकांची निराशा झाली. तसेच सोमवारी या सामन्यासाठी यातील बरेच प्रेक्षक मैदानावर हजर राहू शकणार नाहीत.

आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन 7:30 वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान काही गारा देखील पडल्या. पावसाचा जोर काहीसा विसरल्यामुळे सामना होण्याची चिन्हे वाटत होती. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. त्यावेळी अगदी पंधरा-वीस मिनिटांच्या अत्यल्प कालावधीत मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अकरा वाजेपर्यंत पाऊस न थांबल्याने अखेर सामना सोमवारी खेळण्याचे निश्चित करण्यात आले.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1662885066178195456?t=dXOMa6u_3mrflLxXmt6w0Q&s=19

या सर्व गोष्टींमुळे चाहत्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा सामना एमएस धोनी याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांनी या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एक लाखांपेक्षा जास्त लोक हा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचलेले. मात्र, पावसाने सर्वांचा हिरमोड झाला. हा सामना पाहण्यासाठी केवळ अहमदाबाद नव्हे तर संपूर्ण देशभर तसेच जगभरातून प्रेक्षक पोहोचले होते.

मात्र, पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी ढकलल्याने अनेक जण या सामन्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. कारण, अनेकांनी परतीची तिकिटे देखील काढली असून, त्यांना हा सामना पाहणे शक्य होणार नाही. याव्यतिरिक्त सर्व खर्चाचा ताळमेळ चाहत्यांना दोन दिवस अधिक लावावा लागेल.

(Feel for all the fans who travelled to Narendra Modi Stadium from different parts of the country by booking flights & hotels, some might be unlucky as they have booked the return flight tomorrow)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---