सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाची प्रतीक्षा लागली आहे. हा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) खेळणे ठरले होते. मात्र, पावसाने सगळा घोळ घातला. पावसामुळे अद्याप सामना सुरू झाला नाही. अशात सामन्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका महिला चाहतीने पोलिसाला मारहाण केल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एका महिला चाहतीने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करत त्याचा अपमान केल्याचे दिसत आहे. मात्र, यामागील कारण अद्याप समोर आले नाहीये. महिला चाहती पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करताना आणि अनेकदा धक्का देताना दिसत आहे. यावेळी आसपास प्रेक्षक हे भांडण पाहतानाही व्हिडिओत दिसत आहेत.
This woman slapped and hit this male officer like anything and the helpless guy couldn’t do anything. Is this woman empowerment? pic.twitter.com/m4sMZg0Lds
— ∆ (@TheNaziLad) May 28, 2023
अशात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ट्विटर युजर्सनी वेळ न घालवता कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. काहींनी यावर कठोर कारवाई घेतली पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच, काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, हाच महिला सक्षमीकरणाचा अर्थ आहे का?
Can’t see the officer like this. @GujaratPolice @AhmedabadPolice Pls take action on this
— Amit Suthar ???????? (@amitsuthar189) May 28, 2023
Non acceptable. What’s wrong with her? Why can’t he do anything ?
— Asha Rawal (@Musical_Ashaa) May 28, 2023
Feminism never speak
If same guy do currently he is arrested for sure— aashu (@aashu291298) May 28, 2023
This is the new world where they can get away with anything! Shame on her. Strict action must be taken
— Ishaan ???? (@Ishaan_04) May 28, 2023
Look at this @AhmedabadPolice , also arrest this man who’s making a video instead of helping that on duty officer
— Chirag (@chiraaglodha) May 28, 2023
नाणेफेकीच्या काही मिनिटांपूर्वी पाऊस आल्याने गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघातील संघर्ष बराच काळ लांबला आहे. मात्र, असे म्हटले जात होते की, जर पाऊस 9.30 वाजेपर्यंत थांबला, तर पूर्ण षटकांचा सामना खेळताना चाहत्यांना पाहता येऊ शकतो. मात्र, जर पाऊस सुरूच राहिला, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 29 मे) खेळला जाणार आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेतील गुजरात संघाची कामगिरी पाहिली, तर गुजरातने साखळी फेरीत 14 सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 10 सामने खिशात घालत 20 गुण मिळवले. तसेच, गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, चेन्नई संघाने 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकत 17 गुण मिळवत गुणतालिकेतील दुसरा क्रमांक पटकावला. (ipl 2023 final csk vs gt former cricketer sachin tendulkar trolled on social media for praising shubman gill)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच