इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी इंग्लंडने आज(15 सप्टेंबर) 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली.
त्यांचे सलामीवीर मार्कस हॅरिस आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सुरुवातीलाच विकेट गमावल्या आहेत. हॅरिस 9 धावांवर तर वॉर्नर 11 धावांवर बाद झाला.
वॉर्नरने या संपूर्ण ऍशेस मालिकेत फलंदाजी करताना संघर्ष केला आहे. त्याला या संपूर्ण मालिकेत 10 डावात फलंदाजी करताना एकूण 100 धावाही करता आलेल्या नाहीत. त्याने या मालिकेतील 10 डावात अनुक्रमे 2, 8, 3, 5, 61, 0, 0, 0, 5, 11 अशा मिळून 95 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने 61 वर्षांपूर्वीच्या एका नकोशा विक्रमाला मागे टाकले आहे.
तो एका कसोटी मालिकेत 10 किंवा त्यापेक्षा अधिक डावात फलंदाजी केल्यानंतर सर्वात कमी धावा करणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या जॉन डॉर्सी यांच्या नावावर होता. त्यांनी 1958 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला फलंदाजी करताना 10 डावात 136 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे वॉर्नरला आजही इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. ब्रॉडने त्याला या ऍशेस मालिकेत सातव्यांदा बाद केले आहे. त्यामुळे ब्रॉड वॉर्नरला कसोटीत सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडने आत्तापर्यंत कसोटीत वॉर्नरला 12 वेळा बाद केले आहे.
सध्या द ओव्हलवर सुरु असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 85 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. त्यांचे हॅरिस, वॉर्नर, मार्नस लॅब्यूशाने(14) आणि स्टिव्ह स्मिथ(23) हे फलंदाज बाद झाले आहेत.
एका कसोटी मालिकेत 10+डावात फलंदाजी करताना सर्वात कमी धावा करणारे सलामीवीर फलंदाज –
95 धावा – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2019)
136 धावा – जॉन डॉर्सी (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 1958)
164 धावा – पीएच पंजाबी (भारत विरुद्ध पाकिस्तान, 1954/55)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून चहल, कुलदीपला मिळाली नाही भारताच्या टी२० संघात संधी, विराटने केला खूलासा
–व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथने एका हाताने घेतलेला हा अफलातून झेल पाहिला का?
–आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…