Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षणाची अनेक दृश्ये तुम्ही पाहिली असतील. क्षेत्ररक्षक नेहमीच फलंदाज आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडच्या घरगुती सुपर टी20 स्मॅश लीगमधील आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला आहे.
न्यूझीलंड सुपर टी20 स्मॅश लीगमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट आणि वेलिंग्टन यांच्यातील सामना बेसिन रिझर्व्ह येथे खेळला गेला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेलिंग्टनचा कर्णधार निक केली (Nick Kelly) आणि ट्रॉय जॉन्सन (Troy Johnson) यांनी सीमारेषेजवळ समन्वय साधत फलंदाज विल यंग ( Will Young) याचा आश्चर्यकारक झेल घेतला. क्षेत्ररक्षकाचा हा झेल पाहून सगळेच थक्क झाले. त्याच्या झेलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (fielder take marvellous catch no one can believe watch video)
या व्हिडिओमध्ये विल यंगने समोर फटका मारला. विल यंगचा हा फटका पाहून क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावू लागला. एकेकाळी चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते पण शेवटच्या क्षणी त्याने ढाय मारत अफलातून झेल घेतला. मात्र, अखेरच्या क्षणी त्याचा तोल गेला. हे पाहून त्याने चेंडू मैदानात फेकला. आत फेकलेला चेंडू ट्रॉय जॉन्सनने सहज पकडला.
Don't rub your eyes. It's real!
.
.#SuperSmashOnFanCode pic.twitter.com/J5DRk1U3VA— FanCode (@FanCode) January 13, 2024
सोशल मीडियावर या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते हा व्हिडिओ पाहत आहेत आणि त्याला क्रिकेट इतिहासातील सर्वात शानदार झेल म्हणत आहेत. फॅन कोडने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या कॅचचा व्हिडिओही शेअर केला आहे.
दरम्यान, वेलिंग्टन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाने 16.5 षटकांत 4 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. सेंट्रल डिस्ट्रिक्टकडून जॅक बॉयल (Jack Boyle) याने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली. (Such a catch will not happen again in history During the match, the fielder took an eye-catching catch)
हेही वाचा
IND vs ENG । ध्रुव जुरेलला टीम इंडियात संधी मिळाल्याने कुमार संगकारा खुश, वाचा काय आहे कनेक्शन
कमिन्स आणि स्टार्क आयपीएलचा दबाव पेलण्यासाठी समर्थ! माजी दिग्गजाचे IPL लिलावाबाबत मोठे विधान