---Advertisement---

ऐकावं ते नवलच…! खेळाडूनं हातानं नव्हे चक्क पायानं झेल घेतला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचा स्तर दिवसेंदिवस चांगला होत आहे. खेळाडू कधी डाईव्ह मारताना दिसतात तर कधी सीमारेषेवर दोन प्रयत्नांत झेल पकडतात. सूर्यकुमार यादवनं 2024 टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये असाच झेल घेतला होता, जो निर्णायक ठरला. मात्र, क्षेत्ररक्षणाचा स्तर अद्याप इतकाही वाढला नाही की, खेळाडू हातांऐवजी पायानं झेल घेण्यास सुरुवात करतील. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, असं क्रिकेटच्या मैदानावर प्रत्यक्ष घडलं आहे. येथे एका खेळाडूनं हातानं नव्हे तर चक्क पायाच्या मदतीनं झेल घेतला!

आता एखादा खेळाडू पायानं झेल कसा काय पकडू शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही घटना युरोपियन क्रिकेटच्या टी10 सामन्यात घडली आहे. झालं असं की, क्षेत्ररक्षकानं त्याच्या दिशेनं येणारा चेंडूला पहिले पायानं हवेत उडवलं आणि नंतर तो हातानं झेलला. चेंडू खूपच खाली होता. क्षेत्ररक्षकानं जर चेंडू पायानं हवेत उडवला नसता, तर त्याला झेल घेणं शक्य झालं नसतं. अशाप्रकारे म्हणता येईल की, खेळाडूनं हातानं नव्हे तर पायानं झेल घेतला.

या कॅचचा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, फलंदाजानं लाँग ऑनच्या दिशेनं शॉट मारला. तेव्हा तिथे उभा असलेला क्षेत्ररक्षक काही पावलं धावत येऊऩ चेंडू पायानं हवेत उडवतो. चेंडू हवेत उसळल्यानंतर क्षेत्ररक्षक तो हातानं पकडतो.

 

युरोपियन क्रिकेटमध्ये अशाप्रकारच्या चमत्कारिक घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी युरोपियन क्रिकेटच्या एका टी10 सामन्यात 11 चेंडूत 61 धावा निघाल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रिया आणि रोमानिया यांच्यात झाला, ज्यात ऑस्ट्रियाच्या संघानं हा पराक्रम केला होता. या सामन्यात ऑस्ट्रियाचा कर्णधार आकिब इक्बालनं 19 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा – 

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल का?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ! इमान खलिफनंतर ‘जेंडर’ वादात अडकली आणखी एक महिला बॉक्सर
पंचाचा निर्णय चुकला? ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर अन्याय, स्टार डिफेंडर सेमीफायनलमधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---