मॉस्को। सगळेच आतूरतेने वाट पाहणाऱ्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामना क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आहे. 15 जुलैला लुझनीकी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 8.30ला सुरूवात होणार आहे.
याआधी क्रोएशिया आणि फ्रान्स हे पाच वेळा समोरा-समोर आले आहेत. यातील तीन सामने फ्रान्सने (1998,1999 आणि 2000) जिंकले तर दोन (2004 आणि 2011) अनिर्णीत राहिले.
या पाच सामन्यातील दोन सामने हे मोठ्या स्पर्धेतील आहेत. 1998च्या विश्वचषकात झालेला यातील पहिला सामना फ्रान्सने 2-1ने जिंकला होता. तर दुसरा 2004च्या युरोपियन चॅम्पियन मध्ये झालेला सामना 2-2 असा अनिर्णीत राहिला.
आतापर्यंतच्या झालेल्या विश्वचषकांमधील तीन अंतिम सामन्यांना अधिक वेळ दिला गेला होता. तर यातील 1994 आणि 2006चे हे दोन सामने पेनाल्टी शूट-आऊटमधील निकालावरून त्याचे विजेते ठरवले गेले.
फ्रान्स तिसऱ्यांदा तर क्रोएशिया पहिल्यांदाच अंतिम सामना खेळत आहे
फ्रान्स तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळत आहे. 1998चा सामना ते जिंकले होते पण 2006च्या सामन्यात झालेल्या पेनाल्टीत ते पराभूत होते.
मागील 20 वर्षांपासून फ्रान्स सोडून कोणताच संघ तीन वेळा अंतिम सामना खेळलेला नाही. त्यांच्यानंतर ब्राझिल आणि जर्मनी या संघाचा क्रमांक लागतो. या दोघांनी दोन वेळा अंतिम सामने खेळले आहेत.
दुसरीकडे क्रोएशिया हा पहिलाच अंतिम सामना खेळत आहे. असा करणारा हा संघ जगातील 13वा देश तर 10वा युरोपियन देश आहे.
ज्या संघानी पहिल्यांदा अंतिम सामना खेळला ते जिंकले
ज्या संघानी पहिल्यांदा अंतिम सामना खेळला आहे ते संघ सामना जिंकले आहेत. यात फ्रान्स(1998) आणि स्पेन(2010) यांचा समावेश आहे. तर 1974 मध्ये नेदरलॅंड पराभूत झाला.
तीन वेळचा युरो चॅम्पियनलीग विजेता मीडफिल्डर लुका मॉड्रिक हा क्रोएशियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेतील 6 सामन्यात 2 गोल तर रशिया विरूद्ध महत्त्वाची एक पेनाल्टीही केली आहे.
तसेच मिडफिल्डर इवान रॅकिटिक हाही तेवढाच उत्तम खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत एक गोल केला असला तरी त्याने मॉड्रिकपेक्षा जास्त असे पाच वेळा लक्ष्यावर गोल करण्याचे प्रयत्न केले.
फ्रान्ससाठी फॉरवर्ड एंटोनी ग्रिजमान आणि कायलिन एमबाप्पे हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. या दोघांनी या स्पर्धेत 3 गोल केले आहेत.
2016च्या युरो चॅम्पियन लीगमधील अंतिम सामन्यात फ्रान्स पोर्तुगल कडून पराभूत झाला होता. म्हणून त्यांना त्यांच्या चाहत्यांसाठी हा सामना जिंकणे जरूरी आहे.
फ्रान्सचा राफेल वॅराने किंवा क्रोएशियाचा लुका मॉड्रिक या दोघांपैकी एकाने जर हा विश्वचषक जिंकला तर एकाच वर्षात विश्वचषक आणि चॅम्पियनलीग जिंकणारा तो नववा खेळाडू ठरेल.
जर फ्रान्सने हा विश्वचषक जिंकला तर डिदीयर डेसपॅम्प हे असे तिसरे व्यक्ती होतील ज्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकला.
तसेच क्रोएशियाने या स्पर्धेत 12 आणि फ्रान्सने 10 गोल केले आहेत
फिफा क्रमवारीत क्रोएशिया 20व्या आणि फ्रान्स 7व्या क्रमांकावर आहे.
क्रोएशियाच्या खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे त्यांनी अर्जेंटीनाच्या मेस्सीला आणि इंग्लंडच्या केनला चांगलेच रोखले आहे.
फ्रान्सही उरुग्वे, बेल्जियम आणि अर्जेंटीना या तगड्या संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात पोहचला.
तर आजच्याही सामन्यात क्रोएशियाचा संघ फ्रान्स विरुद्ध अशीच प्रतिभावंत कामगिरी करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संभावित संघ-
क्रोएशिया- डॅनजेल सुबॅसिक, सिमे व्हर्शलजोको, डेजन लोव्हरेन, डोमोगेज विडा, इवान स्ट्रेंनिक, इवान रॅकिटिक, मार्सेलो ब्रोजोव्हिक, अँट रेबिक, लुका मॉडरिक, इवान पेरीसिक, मारियो मॅंडझूकिक
फ्रान्स- ह्यूगो ललोरीस, बेंजामिन पॅवार्ड, सॅम्युअल उमटिती, राफेल वॅराने, लुकास हर्नांडेझ, एनगोलो कॅंटे, पॉल पोग्बा, कोरेंटिन टॉलिसो, कायलिन एमबाप्पे, एंटोनी ग्रिजमान, ऑलिव्हर गिरहोद