भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाचा थरार ६ ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. या विश्वचषकाचा उद्धघाटनाचे दोन सामने खेळवले जाणार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि मुंबई येथे दुपारी ५ वाजता उद्धघाटनाचे सामने होतील. दिल्ली येथील सामना ग्रुप ए मधील संघ कोलंबिया आणि घाना या देशात होणार आहे तर मुंबई येथील उद्धघाटनाचा सामना ग्रुप बी मधील तुर्की आणि न्यूजीलैंड या देशात होईल.
भारतीय संघ देखील पहिल्या दिवसापासूनच या महासंग्रामात आपले कौशल्य दाखवणार आहे. भारताचा सामना जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. हा सामना ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ८ वाजता सुरु होईल. भारतीय संघ फिफाच्या स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे. भारतीय संघासमोर युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या संघाचे तागडे आव्हान असणार आहे.
भारताने आजपर्यंत फिफाच्या कोणत्याही स्पर्धेत सामना खेळले नाहीत. या विश्वचषकात भारत जो पहिला सामना खेळणार आहे तो भारताचा फिफाच्या स्पर्धेत खेळलेला पहिला सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याची सर्व क्रीडाप्रेमी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे. भारतीय संघाने स्पर्धेचा श्री गणेश विजयाने करावा असे प्रत्येक भारतीयाला वाटत आहे. या कारणामुळे भारतीय संघावर पहिल्या सामन्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघ तरी शुभेच्छा देण्यात आकसा मागे पडेल. भारतीय राष्ट्रीय संघाने देखील एकत्र येऊन भारतीय अंडर १७ संघाला शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाइन हे संघाला शुभेछया देताना दिसतात तर बाकीचा संघ त्यांच्या मागे उभा आहे.
यदाकदाचित आपणाला माहिती नसेल तर –
# भरता या स्पर्धेतून फिफा अंडर १७ स्पर्धेची सुरूवात करणार आहे तर पहिल्या सामन्यातील भारताचा विरोधी अमेरिका संघ या स्पर्धेत ब्राझील सोबत संयुक्तरित्या सर्वाधिक १६ वेळा सहभागी झालेला संघ आहे.
# भारत, निगर आणि न्यू कॅलेडोनिया हे तीन संघ या स्पर्धेत नव्याने जोडले जाणार आहेत.