मॉस्को। रविवारी(15जुलै) लुझनीकी स्टेडियमवर झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया सामना पाहण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये खेळ आणि राजकारणातील अनेक व्यक्तींचा समावेश होता.
फिफा विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करून दुसऱ्यांदा फिफाचे विजेतेपद पटकावले.
21व्या फिफा विश्वचषकाचा हा अंतिम सामना बघण्यासाठी जमैकन धावपटू उसेन बोल्ट, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, आयरीश बॉक्सर कोनोर मॅकग्रेगोर, फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू लिलीयन थुरॅम आणि जर्मनचा माजी फुटबॉलपटू फीलीप लह्म हे सेलेब्रेटी यावेळेस उपस्थित होते.
Moscow pic.twitter.com/3nSxRxzupv
— Sourav Ganguly (@SGanguly99) July 15, 2018
Enjoying the World Cup final in Russia.
A truly amazing spectacle! pic.twitter.com/OEeOBmEp9y— Conor McGregor (@TheNotoriousMMA) July 15, 2018
Thanks @Hublot @djsnake #worldcupfinal2018 pic.twitter.com/REFV7vs3Ds
— Usain St. Leo Bolt (@usainbolt) July 15, 2018
तसेच लह्म आणि रोनाल्डिन्हो हे दोघे सुद्धा समारोप सोहळ्यात सहभागी होते. रशियन गायिका एदा गॅरीफुल्लीना हिनेही ‘कॅलींका’ हे गाणे सादर केले. तर रोनाल्डिन्होने आफ्रिकेचे ड्रम वाजवले.
Sem palavras pra descrever a energia de hoje!!! Muito obrigado por todo carinho e por participar desse espetáculo incrível!! 🤙🏾 @fifaworldcup #WorldCupFinal #WorldCup pic.twitter.com/J1FZaHVZq2
— Ronaldinho (@10Ronaldinho) July 15, 2018
तर राजकारणी व्यक्तींमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूल मॅक्रॉन, फिफाचे अध्यक्ष जियान्नी इन्फैंटिनो, क्रोएशियाच्या अध्यक्षा कोलिंडा ग्रबर किटारोविच आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमर पुतीन हे यावेळी स्टेडियमवर होते. सामन्याला सुरूवात होण्याआधी त्यांनी एकमेकांचे हस्तांदोलन केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू
–फिफा विश्वचषक: कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा हा ठरला दुसराच खेळाडू