रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या कारकिर्दीतील 50वी हॅट्ट्रिक केली.
यासंबंधी ट्विटरने असाच एक विक्रम घोषित केला आहे. तो असा की, या 64 सामन्यात करण्यात आलेल्या ट्विट्सचा प्रभाव तब्बल 115 बिलीयन एवढा पडला आहे.
खेळाडूंमध्ये फ्रान्सचा कायलिन एमबाप्पे याने अंतिम सामन्यात केलेल्या चौथ्या गोलवर सर्वाधिक ट्विट्स करण्यात आले. ब्राझिलचा दिग्गज खेळाडू पेलेनंतर कमी वयात गोल करणारा एमबाप्पे हा दुसराच खेळाडू आहे.
मैदानावरील खेळ आणि असभ्य वागणुकीसाठी प्रसिद्ध असलेला ब्राझीलचा नेमार विषयीही सर्वाधिक लोकांनी ट्विट्स केले आहेत.
फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामना आणि ब्राझिल विरुद्ध बेल्जियम यांच्यातील बाद फेरी या दोन सामन्यांदरम्यान खूप ट्विट्स करण्यात आले.
तसेच ब्राझिल संघाविषयी आणि देशाविषयी सगळ्यात जास्त ट्विट करण्यात आले. त्यांच्यानंतर फ्रान्स आणि अर्जेंटीनाचा क्रमांक लागतो.
महत्तवाच्या बातम्या-
–उसेन बोल्ट आता गाजवणार फुटबॉलचे मैदान
–फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी








