---Advertisement---

फिफा विश्वचषक: मेस्सी चाहत्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच

---Advertisement---

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना बाहेर पडल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. त्यातीलच अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचा चाहता असलेल्या मंतोष हल्दर याने आत्महत्या केली.

शनिवारी 30 जूनला झालेल्या सामन्यात अर्जेंटीनाला फ्रान्सकडून 4-3 ने पराभूत व्हावे लागले.

20 वर्षीय मंतोष वेस्ट बंगालमधील छतांगही येथिल रहिवासी होता. त्याने अर्जेंटीनाचा पराभव झाल्याच्या त्याच रात्री गळ्याला फास लावून आत्महत्या केली.

त्याच्याबाबत अधिक माहिती देताना त्याचे वडिल म्हणाले, “मंतोष फुटबॉलचा खुप मोठा चाहता होता. तो टिव्हीवर याच खेळाचे सामने बघायचा. तसेच त्याच्या मित्रांबरोबरही तो हाच खेळ खेळत असे. मात्र अर्जेंटीनाच्या पराभवानंतर तो आमच्याशी काही बोलतही नव्हता. त्यानंतर आम्ही त्याला सकाळी त्याच्या रुममध्ये पंख्याला फाशी घेतलेल्या अवस्थेत बघितले.”

“मंतोष हा अर्जेंटीनाचा खेळाडू दियोगो मॅरेडोना आणि मेस्सीचा खूप मोठा चाहता होता. स्थानिक मैदानावरही तो हाच खेळ खेळताना आम्हाला दिसे. मात्र तो एवढे मोठे पाऊल उचलेल असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. तसेच त्याला मेस्सी पुढचा सामना खेळेल की नाही याचीही भीती होती”, असे त्याच्या शेजारी राहणाऱ्याने सांगितले.

तेथील स्थानिक पोलिसांनी या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले, आम्ही मृताच्या कुटुंबाशी बोललो. यावरूनच असे दिसते की ही एक आत्महत्येची केस आहे.

तसेच ही काही पहिलीच केस नसून केरळमधील दिनू जॉन या मेस्सीचा चाहता असलेल्यानेही आत्महत्या केली आहे.

त्यावेळी अर्जेंटीना गटातील दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाकडून 3-0ने पराभूत झाली होती.

फ्रान्स विरूद्धच्या सामन्यात अर्जेंटीना 2-1 अशी आघाडीवर होती. पण बेंझामिन पवार्ड आणि कायलीन मबाप्पे यांनी अचूक क्षणी केलेल्या गोलमुळे 2014च्या उपविजेत्याला फिफामधून बाहेर पडावे लागले.

मेस्सी जून महिन्यातच 31 वर्षांचा झाला आहे. तो 2022च्या विश्वचषकात खेळेल की नाही याची गॅरंटी नाही. मेस्सीच्या खेळावर तसे प्रश्नचिन्ह नाही.

पण अर्जेंटीनाचा संघ 2022ला कतार मध्ये होणाऱ्या पुढच्या विश्वचषकास पात्र ठरेल की नाही ही चिंतेची बाब आहे. कारण सध्या रशियात सुरू असलेल्या विश्वचषकात अर्जेंटीनाला कसातरी प्रवेश मिळाला.

महत्वाची बातम्या-

फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत

एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment