---Advertisement---

बिगुल वाजले! फुटबॉल विश्वचषकाला कतारमध्ये धमाकेदार सुरुवात; आंतरराष्ट्रीय ताऱ्यांनी‌ गाजवला उद्घाटन सोहळा

On: रविवार, नोव्हेंबर 20, 2022 9:34 PM
---Advertisement---

जगाच्या पाठीवरील खेळांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जाणारा फिफा विश्वचषक रविवारी (20 नोव्हेंबर) सुरू कतार येथे सुरू झालेला हा फुटबॉल विश्वचषक पुढील एक महिना फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असेल. या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सिताऱ्यांनी हजेरी लावली.

भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसिद्ध कोरियन बँड बीटीएस या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या व्यतिरिक्त निकी मिनाज, मरियम फेरेझ तसेच भारतीय अभिनेत्री नोरा फातेही यादेखील सादरीकरण करतील. प्रसिद्ध गायिका शकीराने 2010 च्या विश्वचषकात गायलेले वाका वाका हे गाणे देखील सादर करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर कतार आणि इक्वेडोर यांच्या दरम्यान सलामीचा सामना होईल. विशेष म्हणजे प्रथमच आखाती देशांमध्ये विश्वचषकाचे आयोजन होत आहे.

 

हा विश्वचषक सुरुवातीपासून अत्यंत वादग्रस्त राहिला आहे.‌ भ्रष्टाचार करून या स्पर्धेचे मिळवले गेले असे सांगण्यात आले होते. तसेच अनेक युरोपियन देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली होती. मात्र, अखेरीस या सर्वावर मात करत विश्वचषकाला अपेक्षित सुरुवात झाली.

माझी विश्वविजेते फ्रान्स या स्पर्धेत देखील विजेतेपदाचे दावेदार असतील. त्याचवेळी मागील दोन दशकांपासून फुटबॉल विश्व गाजवणारे लिओनेल मेस्सी व ख्रिस्टीआनो रोनाल्डो हे अखेरच्या वेळी या स्पर्धेत खेळताना दिसतील.

(FIFA World Cup 2022 Opening Ceremony Qatar)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझी इच्छा आहे, पण आता फक्त एकच सामना राहिलाय’, वाचा काय म्हणाला कर्णधार हार्दिक
विराटपेक्षा सूर्याच भारी! विश्वास बसत नसेल, तर ‘ही’ आकडेवारी पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---