कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी (22 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया असा सामना खेळला गेला. या सामन्यात यंदाच्या विश्वचषकातील पहिला अपसेट पाहायला मिळला. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाने 2-1 असे पराभूत करत खळबळ उडवून दिली.
https://twitter.com/FIFAWorldCup/status/1595027269327605760?t=gmiqREO8Bwa4UhLgUIWD-w&s=19
लुसेल येथे झालेल्या या सामन्यात अर्जेंटिना संघ विजयी सलामी देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. आपला अखेरचा विश्वचषक खेळत असलेला दिग्गज लिओनेल मेस्सी दहाव्या मिनिटाला मिळालेल्या फायदा उठवत संघाला आघाडीवर नेले. यानंतर अर्जेंटिना संघाच्या आक्रमकाने अजिबात हयगय न करता सौदी अरेबियाच्या गोल पोस्टवर धडक मारली. मात्र, त्यांना यश लाभले नाही. पहिल्या हाफच्या अखेरीस अर्जेंटिना 1-0 अशा आघाडीने मैदानाबाहेर गेले.
दुसऱ्या हाफचा खेळ सुरू झाला तेव्हा शेहरीने गोल करत सौदी अरेबिया साठी इतिहास रचला. त्याच्या या बरोबरीच्या गोलनंतर पाच मिनिटांनी डावसरीने सौदी अरेबियाला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. अचानक पिछाडीवर पडलेल्या अर्जेंटिनाने त्यानंतर गोल करण्याचे प्रयत्न वाढवले. मात्र, अतिशय साहसाने व कौशल्याने सौदी अरेबियाच्या बचावपटूंनी खेळ दाखवत अर्जेंटिनाला बरोबरी साधू दिली नाही. परिणामी पूर्ण वेळेनंतर सामना सौदी अरेबियाने आपल्या नावे केला.
या सामन्यात अर्जेंटिना संघाने मैदानावर वर्चस्व गाजवले. तब्बल 70 टक्के चेंडू त्यांच्या ताब्यात होता. तर, त्यांनी तब्बल 15 शॉट्स व 6 शॉट ऑन टारगेट लगावले. मात्र, महत्त्वाचे दोन गुण सौदी अरेबियाने मारले. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे. पुढील दोन्ही सामन्यात त्यांना विजय मिळवावे लागतील.
(FIFA World Cup Saudi Arabia Beat Favorites Argentina)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय