-नचिकेत धारणकर
जगातील सर्वात लोकप्रिय समजला जाणारा खेळ फुटबाॅलच्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याएवढे दिवस बाकी आहेत. ३२ संघ विश्वचषकासाठी पात्र झाले असून त्यांचे ८ गटात विभाजन झाले आहे. आफ्रिका, आशिया, युरोप, मध्य आणि उत्तर अमेरिका, कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकेतून सर्व संघ सहभागी झाले आहेत.
गट अ:-
पहिल्या गटात विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या रशियाला थेट स्थान मिळाले तर आशियामधील सौदी अरेबिया आफ्रिकेतील इजिप्त आणि दक्षिण अमेरिकेतील उरूग्वेचा समावेश आहे. अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी रशियाला उरुग्वे आणि इजिप्तच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
रशिया:- जागतिक क्रमवारी ६६
थेट पात्र ठरलेल्या आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या रशियाला अंतिम १६ मध्ये स्थान मिळवणे सुद्धा खडतर होऊ शकते. सुवारेझच्या ऊरूग्वे आणि प्रिमियर लीगमध्ये सर्वाधीक गोल्स करणाऱ्या सलाहच्या एजिप्त संघाचे स्थान निश्चित समजले जात आहे.
सामन्यांचे वेळापत्रक:- रशिया विरुद्ध
१४ जून सौदी अरेबिया
१९ जून इजिप्त
२५ जून ऊरूग्वे
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी:- ४थे स्थान (१९९६)
विश्वचषकातील प्रदर्शन:- ४० सामने १७ विजय १५ पराभव तर ८ सामने ड्राॅ.
विश्वचषकात ६६ गोल्स केले असून ४७ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी:-
ब्राझील (२०१४):- साखळी फेरीतच आव्हान संपले
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२):- साखळी फेरीतच आव्हान संपले
अमेरिका(१९९४):- साखळी फेरीतच आव्हान संपले
इटली(१९९०):- साखळी फेरीतच आव्हान संपले
मॅनेजर:- स्टॅनिस्कॅव्ह चेर्सेसोव्ह
प्रमुख खेळाडू:- ॲलेक्झांडर गोलोविन
संभाव्य रचना:- ३-५-२
सौदी अरेबिया:- जागतिक क्रमवारी ७०
आशिया मधून रशियासाठी पात्र ठरलेल्या सौदी अरेबिया संघाची मदार असेल ती त्यांचा मोहम्मद अल सहलावीवर. पात्रता फेरीत सर्वाधीक गोल्स करत त्याने इतर संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. २००६ नंतर पात्र ठरलेल्या या संघाकडून काही धक्कादायक निकालाची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
सामन्यांचे वेळापत्रक:- सौदी अरेबिया विरुद्ध
१४ जून रशिया
२० जून ऊरुग्वे
२५ जून इजिप्त
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी:- अंतिम १६ (१९९४)
विश्वचषकातील प्रदर्शन:- १३ सामने २ विजय ९ पराभव तर २ सामने ड्राॅ.
विश्वचषकात ९ गोल्स केले असून ३२ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी:-
जर्मनी (२००६):- अंतिम ३२
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२):- साखळी फेरीतच आव्हान संपले
फ्राॅंस (१९९८):- साखळी फेरीतच आव्हान संपले
अमेरिका (१९९४):- साखळी फेरीतच आव्हान संपले
मॅनेजर:- जुआन ॲंटोनिओ पिझ्झी
प्रमुख खेळाडू:- मोहम्मद अल सहलावी
संभाव्य रचना:- ४-३-३
इजिप्त:- जागतिक क्रमवारी ४६
प्रिमियर लीगचा सर्वोत्तम खेळाडू मोहम्मद सलाह हीच इजिप्तची ओळख झाली असून आफ्रिकेतून प्रथम स्थानावर पात्र होणार्या इजिप्तला पात्रता फेरीत सुद्धा सलाहनेच तारले. एकूण ८ पैकी ५ गोल्स त्याने केले. परंतु युसीएलच्या अंतिम सामन्यात दुखापत झाल्याने तो कधीपासून खेळणार हा सर्वांपुढे प्रश्न आहे. त्याच्या उपस्थितीमुळेच संघ पुढील फेरीत जाण्याचा दावेदार समजला जातोय. आज पर्यंत केवळ दोनदा विश्वचषकात खेळणार्या इजिप्तला एकही सामना जिंकण्यात यश मिळाले नाही. या विश्वचषकात त्यांच्यासमोर आपले सर्वोत्तम स्थान मिळवण्याची संधी आहे.
सामन्यांचे वेळापत्रक:- इजिप्त विरुद्ध
१५ जून ऊरूग्वे
२० जून रशिया
२५ जून सौदी अरेबिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी:- अंतिम ३२ (१९३४ आणि १९९०)
विश्वचषकातील प्रदर्शन:- ४ सामने २ पराभव २ ड्राॅ.
विश्वचषकात एकूण ३ गोल्स केले आहेत तर ६ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
२ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी:-
इटली (१९९०):- साखळी फेरीतच आव्हान संपले
इटली (१९३४):- साखळी फेरीतच आव्हान संपले
मॅनेजर:- हेक्टर कुपर
प्रमुख खेळाडू:- मोहम्मद सलाह
संभाव्य रचना:- ४-२-३-१
ऊरूग्वे:- जागतिक क्रमवारी १७
सुवारेझ, कवानी, डियेगो गोदिन यांच्यासारख्या खेळाडूंनी सजलेल्या ऊरूग्वेसाठी पुढील फेरीत प्रवेश मिळवणे जास्त अवघड होणार नाही. दोन वेळेस विजेतेपद पटकवणाऱ्या ऊरुग्वेला १९५० नंतर विजेतेपद मिळवता आले नाही. दक्षिण अमेरिकामधून ब्राझील पाठोपाठ दूसऱ्या स्थानावर पात्र झाले आहेत.
सामन्यांचे वेळापत्रक:- ऊरुग्वे विरूद्ध
१५ जून इजिप्त
२० जून सौदी अरेबिया
२५ जून रशिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी:- विजेतेपद (१९३० आणि १९५०)
विश्वचषकातील प्रदर्शन:- ५१ सामने २० विजय १९ पराभव तर १२ ड्राॅ.
विश्वचषकात ८१ गोल्स केले असून त्यांच्या विरुद्ध ७० गोल्स झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी:-
ब्राझील (२०१४):- अंतिम १६ संघात प्रवेश
आफ्रिका (२०१०):- ४थे स्थान
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२):- साखळी फेरीतच आव्हान संपले
इटली (१९९०):- अंतिम १६ संघात प्रवेश
मॅनेजर:- आॅस्कर टॅबरेझ
प्रमुख खेळाडू:- सुवारेझ
संभाव्य रचना:- ४-४-२