फ्रान्स बरोबरच पेरू, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या गटातून एकट्या फ्रान्सची पुढील फेरीतील दावेदारी निश्चित मानली जाते आहे. या वर्षीच्या सर्व गटातील कोणते २ संघ पुढील फेरीत जातील हे सांगणे जास्त अवघड नाही फक्त क गटातीलच दुसऱ्या स्थानासाठी पेरू, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा असेल असा अंदाज आहे. फ्रान्सला विजेतेपदाचे प्रबळ दावेदारांपैकी एक समजले जात असल्याने त्यांना गटातून पहिले स्थान मिळवणे जास्त गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया पेरू किंवा डेन्मार्कला हरवून त्यांचे पुढील फेरीत जायचे स्वप्नभंग करू शकते.
फ्रान्स :- जागतिक क्रमवारी ७
जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या तरुण खेळाडूमध्ये ज्यांचे नाव सर्वात पुढे आहेत ते ओसुमाने डेम्बले, कायलिन मबाप्पे, उमतिति, थॉमस लेमार आणि विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू आहेत फ्रान्सच्या संघाचे. फ्रान्सची मदार याच तरुण खेळाडूंसोबत त्यांचा आक्रमक खेळाडू ग्रिझमानवर असेल. पोगबा सारखा मध्यमफळीतील खेळाडू सुद्धा फ्रान्सकडे आहे. सर्व विभागात उत्तम खेळाडूंचा भरणा असलेला संघ उपउपांत्य फेरीपर्यंत तरी सहज मजल मारेल असा सर्वांचा विश्वास आहे.
सामन्यांचे वेळापत्रक :- फ्रान्स विरुद्ध
१६ जून ऑस्ट्रेलिया
२० जून पेरु
२६ जून डेन्मार्क
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- विजेते (१९९८)
विश्वचषकातील प्रदर्शन :- ५९ सामने २८ विजय १९ पराभव तर १२ सामने ड्रॉ.
फ्रान्सने विश्वचषकात एकूण १०६ गोल्स केले असून ७१ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- अंतिम ८ संघात प्रवेश.
आफ्रिका (२०१०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
जर्मनी (२००६) :- २रे स्थान
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
मॅनेजर :- डिडिएर डेरचॅम्प्स
प्रमुख खेळाडू :- ग्रिझमान
संभाव्य रचना :- ४-२-२-२
ऑस्ट्रेलिया : जागतिक क्रमवारी ४०
२०१० साली नेदरलँडला अंतिम सामन्यात पोहचवण्यात महत्वाचे योगदान असणाऱ्या त्यांच्या कोच बर्ट वॅन मारविजकने नुकतेच ऑस्ट्रेलियासंघाचे मॅनेजरपद घेतले असून त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या मध्यमफळीवर त्यांची मदार असेल. पेरू किंवा डेन्मार्कला पराभवाचा धक्का देऊन त्यांच्या पुढील फेरीतजाण्याच्या आशेवर पाणी फेरू शकता. ऍरॉन मोय हा ऑस्ट्रेलियाच्या मध्यमफलीतील प्रमुख खेळाडू आहे.
सामन्यांचे वेळापत्रक :- ऑस्ट्रेलिया विरुद्ध
१६ जून फ्रान्स
२१ जून डेन्मार्क
२६ जून पेरू
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- अंतिम १६ मध्ये स्थान
विश्वचषकातील प्रदर्शन :- १३ सामने २ विजय ३ पराभव तर ८ सामने ड्रॉ.
फ्रान्सने विश्वचषकात एकूण ११ गोल्स केले असून २६ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
आफ्रिका (२०१०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.या वर्षी
जर्मनी (२००६) :- अंतिम १६ मध्ये आव्हान संपले.
जर्मनी (१९७४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
मॅनेजर :- बर्ट वॅन मारविजक
प्रमुख खेळाडू :- ऍरॉन मोय
संभाव्य रचना :- ४-२-३-१
पेरू :- जागतिक क्रमवारी ११
१९८२ साली स्पेन विश्वचषकानंतर या वर्षी पहिल्यांदा पेरूसंघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहे. पाओलो गुरेरोवर त्यांच्या आक्रमणाची जबाबदारी आहे. रिकार्डो गरेकाया अर्जेन्टिनाच्या प्रशिक्षकाच्या रणनीतीवर पेरूचा या विश्वचषकातील प्रवास ठरेल.
सामन्यांचे वेळापत्रक :- पेरू विरुद्ध
१६ जून डेन्मार्क
२१ जून फ्रान्स
२६ जून ऑस्ट्रेलिया
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- उपउपांत्य फेरीत फेरीत प्रवेश (१९७०)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १५ सामने ४ विजय ८ पराभव तर ३ सामने ड्रॉ.
फ्रान्सने विश्वचषकात एकूण १९ गोल्स केले असून ३१ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
स्पेन (१९८२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
अर्जेन्टिना (१९७८) :- ८वे स्थान
मेक्सिको (१९७०) :- उपउपांत्य फेरीत फेरीत प्रवेश
ऊरुग्वे (१९३०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
मॅनेजर :- रिकार्डो गरेका
प्रमुख खेळाडू :- पाओलो गुरेरो
संभाव्य रचना :- ४-४-२
डेन्मार्क :- जागतिक क्रमवारी १२
केवळ ४ वेळेस विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या डेन्मार्क संघाला प्रथम फेरी पुढे अजून जाता आले नाही. त्यांच्या इतिहासातील सर्वोत्तम समजला जाणारा टॉटेनहॅम हॉट्सपर कडून खेळणारा एरिक्सन त्यांच्या संघाची कामगिरी उंचावण्यात मदत करू शकतो. मध्यमफळीत खेळणारा हा खेळाडू त्यांच्या संघाच्या आक्रमणाला दिशा दाखवेल. त्याच्या संघात उणीव भासेल तर ती फक्त एका आक्रमक खेळाडूचे.
सामन्यांचे वेळापत्रक :- डेन्मार्क विरुद्ध
१६ जून पेरू
२१ जून ऑस्ट्रेलिया
२६ जून फ्रान्स
विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- उपउपांत्य फेरीत फेरीत प्रवेश (१९९८)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १६ सामने ८ विजय ६ पराभव तर २ सामने ड्रॉ.
फ्रान्सने विश्वचषकात एकूण २७ गोल्स केले असून २४ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
फ्रान्स (१९९८) :- उपउपांत्य फेरीत फेरीत प्रवेश
मेक्सिको (१९८६) :- अंतिम १६ संघात प्रवेश.
मॅनेजर :- अॅगे हरईडे
प्रमुख खेळाडू :- ख्रिस्टियन एरिक्सन
संभाव्य रचना :- ४-३-३