विश्वचषकाच्या साखळी फेरीचे सामने पार पडले आणि १६ संघांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला. काही अपेक्षित तर खुप अनपेक्षित निकालांसाठी साखळी फेरी गाजली म्हणायला काही हरकत नाही. मोठ्या उलटफेरांसह काही विक्रम सुद्धा यादरम्यान झाले. आजपासुन १६ संघांच्या सामन्यांना सुरुवात होईल उपांत्यफेरीच्या प्रवेशासाठी सगळ्या संघांचे प्रयत्न असतील.
पण त्यापूर्वी या विश्वचषकाच्या साखळी फेरीत अनेक विक्रम झाले त्यातील काही प्रमुख विक्रम खालीलप्रमाणे :-
-२ आठवड्यात झालेल्या ४८ सामन्यात ३२ संघानी मिळून तब्बल १२२ गोल्स केले. विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाने कमीतकमी २ गोल्स आपल्या नावे केले.
-९०व्या किंवा ९० मिनिटानंतर अतिरिक्त वेळेत तब्बल २० गोल्स झाले जे मागील ३ विश्वचषकाच्या एकूण गोल्स पेक्षा जास्त आहेत. त्यातील ८ गोल्स सामन्यात निर्णायक होते.
-व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) च्या वापरामुळे या वर्षी साखळी सामन्यातच तब्बल २४ पेनल्टी दिल्या गेल्या त्यातून १८ पेनल्टी किकवर गोल झाले तर गोल न झालेल्या ६ मधून १-१ प्रत्येकी मेस्सी आणि रोनाल्डोची पेनल्टी होती.
तसेच सर्वाधिक स्वयंम गोल सुद्धा नोंदले गेले ज्यांची संख्या ९ होती.
-विश्वचषकात सर्वाधिक वयाचा खेळाडू होण्याचा मान इजिप्तच्या गोलकिपर इस्साम हादर्यने (४५ वर्ष १६२ दिवस) मिळवला. वयाच्या ४५व्या वर्षी त्याने पेनल्टी वाचवली.
-सामन्याच्या १५व्या सेकंदाला येल्लो कार्ड मिळवण्याचा सुद्धा विक्रम झाला.
-स्पेन विरुद्ध हॅट्ट्रिक करणारा पहिला खेळाडू तसेच वयाच्या ३३व्या वर्षी हॅट्ट्रिक करत विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा मान रोनाल्डोने मिळवला.
-या विश्वचषकात किशोरवयात, विशीत, आणि तिशीत गोल करणारा पहिले खेळाडू मेस्सीच्या रूपाने मिळाला. तसेच मेस्सीने विश्वचषकात एकूण १०७ (१८ सामन्यात) ड्रिबल्स करत मॅराडोनाचा १०५ (२१ सामन्यात) चा विक्रम मोडीत काढला.
-या विश्वचषकात गोलविरहित सामना बरोबरीत सुटायला तब्बल ३७ सामने लागले जो सुद्धा १ विक्रम आहे.
-पहिल्यांदा संघ पुढील फेरीत जाण्यासाठी फेअर प्लेचा आधार घ्यावा लागला. ‘फ’ गटात जपान आणि सेनेगलचे गुण(४) तसेच गोलफरक(०) समान असल्याने जपान संघ ४ येल्लो कार्ड असल्याने पुढील फेरीत गेला तर सेनेगल ६ येल्लो कार्डसह स्पर्धेबाहेर.
-१९८२ नंतर पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम १६ संघात प्रवेश मिळवण्यात आफ्रिकन संघांना अपयश आले.
-तर मागील २ विश्वचषकाप्रमाणेच यावर्षी सुद्धा गतविजेत्या संघाचे साखळी सामन्यातच आव्हान संपुष्टात आले. २०१० साली २००६चे विजेते इटली तर २०१४ साली २०१० चे विजेते स्पेन साखळी फेरीतच बाद झाले होते. या वर्षी ती परंपरा २०१४चे विजेते जर्मनीने पुढे नेली.
आजपासून अंतिम १६ मध्ये प्रवेश मिळालेल्या संघांचे सामने सुरु होतील त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे:-
https://twitter.com/Maha_Sports/status/1012964521600696320
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना
–फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ