पुणे (1 एप्रिल 2024) – आजचा दुसरा सामना रायगड विरुद्ध धाराशिव यांच्यात झाला. रायगड संघ 4 विजयासह दुसऱ्या स्थानावर होता तर धाराशिव संघ अजून ही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत होता. रायगड कडुन प्रशांत जाधव ने जोरदार सुरुवात करत आपल्या पहिल्या तीन चढाईत 5 गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. 5 व्या मिनिटाला रायगड संघाने धाराशिव संघाला ऑल आऊट करत 10-00 अशी आघाडी मिळवली. प्रशांत जाधव ने पुढील सलग 3 चढाईत धाराशिव संघाचे 6 खेळाडू बाद करत पुन्हा एकदा धाराशीव संघाला ऑल आऊट करत 20-01 अशी आघाडी मिळवली.
धारशिव कडून साहिल जारडकर ने सुपर रेड करत 4 गुण मिळवत सामन्यात 05-20 अशी पिछाडी कमी केली होती. मात्र रायगडच्या प्रशांत जाधव ने चपळाईने चढाया करत सामना एकतर्फी केला होता. मध्यंतराला रायगड संघाकडे 33-07 अशी आघाडी मिळवली होती. मध्यांतर नंतरही रायगड संघाने जोरदार खेळ करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. प्रशांत जाधव ला निखिल शिर्के ने चांगली साथ देत गुण मिळवले. राज मोरे व निशांत म्हात्रे यांनी बचावात उत्कृष्ट खेळ केला.
रायगड संघाने धाराशिव संघावर 67-14 अशी मात देत विजय मिळवला. रायगड संघाने पाचव्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. रायगड कडून प्रशांत जाधव ने चढाईत सर्वाधिक 19 गुण मिळवले. तर निखिल शिर्के व आविष्कार पाटील ने चढाईत प्रत्येकी 7 गुण मिळवले. बचावफळीत राज मोरे व निशांत म्हात्रे यांनी बचावफळीत प्रत्येकी 6 गुण मिळवले. धाराशिव जारडकर ने चढाईत 6 तर अनिकेत भारती ने पकडीत 3 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- प्रशांत जाधव, रायगड
बेस्ट डिफेंडर- निशांत म्हात्रे, रायगड
कबड्डी का कमाल – प्रशांत जाधव, रायगड
महत्त्वाच्या बातम्या-रेलीगेशन फेरीत लातूर संघाची नांदेड संघावर मात