---Advertisement---

‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी करणारा जड्डू पहिला खेळाडू नाही, सीएसकेच्याच सहकाऱ्याने रचला होता इतिहास

On: रविवार, एप्रिल 25, 2021 10:59 PM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्या दरम्यान झालेल्या आयपीएल २०२१ मधील १९ व्या सामन्यात सीएसकेने आरसीबीवर ६९ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सीएसकेचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजाने अफलातून कामगिरी करत सीएसकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

जडेजाने खेळाच्या तिन्ही विभागात चमकदार कामगिरी करून सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. जडेजाने या सामन्यात जसा खेळ दाखवला तसा यापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये केवळ एकच खेळाडू दाखवू शकला होता.

जडेजाची ऐतिहासिक कामगिरी
रवींद्र जडेजाने आरसीबीविरूद्ध आपल्या संघाला एखादी विजय मिळवून दिला. फलंदाजी करताना जडेजाने २८ चेंडूमध्ये नाबाद ६२ धावा बनवताना ४ चौकार व ५ सरकारची आतिषबाजी केली.

गोलंदाजी करताना जडेजाने आरसीबीच्या फलंदाजांना जखडून ठेवले. आपल्या ४ षटकात केवळ १३ धावा त्याने दिल्या. त्याने ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स व वाशिंग्टन सुंदर यांचे बळी आपल्या नावे केले. तसेच, डॅनियल ख्रिस्टीयनला थेट फेककरून धावबाद केले. जडेजाने आपल्या कोट्यातील चौथे षटक त्याने निर्धाव फेकले.

यापूर्वी या खेळाडूने केलेली कामगिरी
टी२० क्रिकेटच्या इतिहासात जडेजासारखी कामगिरी यापूर्वी केवळ इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विलीने केली आहे. विलीने २०१८ टी२० स्लॅममध्ये यॉर्कशायरसाठी खेळताना नॉर्दम्पटनशायरविरूद्ध ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने ५ पेक्षा अधिक म्हणजे ७ षटकार मारले होते. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना १ षटक निर्धाव देखील टाकले होते. विली २०१८ आयपीएलमध्ये सीएसकेचा सदस्य होता.

महत्त्वाच्या बातम्या –

पंतचा मोठा विक्रम! श्रेयस अय्यरला तर मागे टाकलेच पण यष्टीरक्षक म्हणून धोनी, गिलख्रिस्टलाही ठरला भारी

सर जडेजाला तोड नाही! बंगलोरविरुद्धच्या अष्टपैलू कामगिरीने ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

आयपीएलमध्ये एका षटकात ५ षटकार ठोकणारे ३ फलंदाज; जडेजाआधी यांनी केली आहे कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---