लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 292 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून पदार्पण करणारा हनुमा विहारी आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अर्धशतक केले.
याबरोबरच विहारीने खास विक्रमही केला आहे. तो इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याने या सामन्यात 124 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 56 धावा केल्या आहेत. त्याने जडेजा बरोबर सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली.
याआधी इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम रुसी मोदी, राहुल द्रविड(1996) आणि सौरव गांगुली(1996) या भारतीय फलंदाजांनी केला आहे. विशेष म्हणजे या तीघांनीही इंग्लंडमधील लॉर्ड्सवर पदार्पण केले होते.
मोदी यांनी1946 ला पदार्पण करताना नाबाद 57 धावा केल्या होत्या. तर द्रविड आणि गांगुलीने एकत्रच 1996 ला पदार्पण केले होते. त्यांनी अनुक्रमे 95 आणि 131 धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने शेवटच्या सामन्यासाठी केला भुयारी रेल्वेने प्रवास
–युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना
–भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला वेगवान गोलंदाज अँडरसनला झाली मोठी शिक्षा