युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना

न्युयॉर्क।  युएस ओपनच्या पुरूष एकेरीचा अंतिम सामना उद्या (१०ऑगस्ट) सर्बियाचा नोवाक जोकोविच विरुद्ध अर्जेंटीनाचा जुआन मार्टीन डेल पोट्रो यांच्यात रंगणार आहे.

डेल पोट्रो हा दुसरे ग्रॅंड स्लॅम तर जोकोविच १४वे ग्लॅंड स्लॅम जिंकण्यास आतुर आहेत. हे दोघे १८ वेळा आमने-सामने आले असून जोकोविचने यातील १४ सामन्यात विजय मिळवला आहे.

डेल पोट्रोने २००९च्या युएस ओपनमध्ये रॉजर फेडररला पाच सेटच्या सामन्यात पराभूत करत पहिले ग्रॅंड स्लॅम पटकावले होते. तसेच जोकोविच जेव्हा युएस ओपनच्या अंतिम फेरीत नवीन खेळाडूविरुद्ध खेळला आहे त्यामध्ये त्याला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे तो हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.

जोकोविचने यावर्षीच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले असून तो त्याचा ८वा युएस ओपनचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच जर जोकोविचने हा अंतिम सामना जिंकला तर तो पीट सॅम्प्रसच्या सर्वकालीन १४ग्रॅंड स्लॅमची बरोबरी करेल. या यादीत रॉजर फेडरर (२०) आणि राफेल नदाल (१७) यांचाही समावेश आहे.

उपांत्य सामन्यात जोकोविचने जपानच्या केइ निशिकोरीला ६-३, ६-४, ६-२ तर राफेल नदालने दुखापतीमुळे मध्येच सामना सोडल्याने डेल पोट्रो अंतिम सामन्यात पोहचला. तसेच नदाल बाहेर पडण्याआधी डेल पोट्रो ७-६, ६-२ असा आघाडीवर होता.

डेल पोट्रोने या स्पर्धेत एकूण ६८ सर्व्ह केले असून त्याने सलग १२ सेट जिंकले आहेत. तसेच पहिल्या दोन प्रतिस्पर्ध्यांना त्याने दोन तासांतच पराभूत केले आहे.

अंतिम सामन्याचा त्याचा प्रवास जोकोविचपेक्षा कठिण होता. तो पहिले वीसमध्ये मानांकन असणाऱ्या टेनिसपटू विरुद्ध खेळला असून त्यात विसावे मानांकन असणाऱ्या बोरना कोरिच, अकरावे मानांकन असणारा अमेरिकेचा अव्वल टेनिसपटू जॉन इसनर आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा राफेल नदालचा समावेश आहे.

हे दोघे शेवटचे २०१७च्या एटीपी १०००मास्टर्समध्ये समोरा-समोर आले होते. यात जोकोविचने ६-१, ६-४ असा विजय मिळवला होता.

जोकोविचने २०११ आणि २०१५ला युएस ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच एटीपी क्रमवारीत जोकोविच सहाव्या तर डेल पोट्रो तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला वेगवान गोलंदाज अँडरसनला झाली मोठी शिक्षा

जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

You might also like