---Advertisement---

दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायका आयपीएल दरम्यान घेतात ड्रग्स, पहा कुणी केलाय आरोप

On: गुरूवार, सप्टेंबर 24, 2020 8:01 PM
---Advertisement---

मुंबई । आजकाल बॉलिवूडमध्ये ड्रग्स या विषयावर बरीच खळबळ उडाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) वतीने चित्रपट जगातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना सतत चौकशीसाठी बोलावले जाते. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासह अनेकांना समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने दावा केला आहे की, आयपीएलमध्ये ड्रग्जचा वापरही भयंकर झाला आहे. ती म्हणते की, “आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यानंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या बायका वॉशरूममध्ये कोकीनचे सेवन करायच्या.”

शर्लिन चोप्राने काय सांगितले?

न्यूज चॅनल एबीपीशी बोलताना शर्लिन चोप्राने असेही म्हटले आहे की, जर त्यांना एनसीबीच्या वतीने चौकशीसाठी बोलावण्यात आले तर ती सर्व रहस्ये उघडेल. ती म्हणाली की, “केकेआर सामन्यानंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या बायका वॉशरूममध्ये कोकिनचे सेवन करायचे,” मात्र, आयपीएलच्या कोणत्या हंगामात ही घटली याबद्दल तीने सांगणे टाळले. आयपीएल यंदा तिसर्‍यांदा देशाबाहेर खेळले जात आहेत. यापूर्वी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतही घेण्यात आली होती. तर दुसर्‍या वेळी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन केले जात आहे.

वॉशरूममध्ये कोकिनचे सेवन

शर्लिन चोप्राने ड्रग्ज पार्टीबद्दल सांगितले, ”मी केकेआरचा सामना पाहण्यासाठी कोलकाताला येथे गेली होती.  सामना संपल्यानंतर पार्टी पार पडली. मी ही त्या पार्टीत गेले होते. त्या पार्टीत मी पाहिले की तेथे क्रिकेटपटू आणि बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी आले होते. मला नाचताना खूप कंटाळा आला होता.  म्हणून मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो. तिथे काय चालले आहे ते पाहून मला आश्चर्य वाटले. प्रत्येकजण कोकीनचे सेवन करत  होते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---