भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने 87.58 चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्णपदक जिंकले आहे. एकीकडे त्याने संपूर्ण देशाचे नाव चमकवले आहे. तर दुसरीकडे त्याला शुभेच्छा देतानाच्या एका ट्वीटवरुन सोशल मीडियावर एक नवा वाद सुरू झाला आहे.
नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अत्यंत वादग्रस्त ट्विट केले आहे. नीरजच्या विजयावर अशोक यांनी ट्वीट केले, ‘खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचे नाव काढताच सुवर्णपदक आले आहे.’ त्यांनी आपल्या ट्विटच्या हॅशटॅगमध्ये पनौती देखील लिहिले आहे. अशोक यांच्या या ट्विटवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
अलीकडेच भारत सरकारने निर्णय घेतला आहे की, ‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार’ आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावावर देण्यात येईल. या विषयावर सर्वत्र सतत वादविवाद चालू आहे.
भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर अंतर कापले होते. दुसऱ्यांदा त्याने 87.58 चे अंतर कापले होते. यासह, त्याने त्याच्या पात्रता रेकॉर्डच्या पलीकडे भाला फेकला होता. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नव्हे तर हे भारताचे मैदानी खेळ प्रकारातीलही (ऍथलेटिक्स) पहिले सुवर्णपदक आहे.
https://twitter.com/ashokepandit/status/1423990459274121218?s=20
13 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरज चोप्राच्या आधी अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत वैयक्तिक खेळात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर नीरजचे सुवर्णपदक हे ऑलिम्पिकमधील भारताचे वैयक्तिक प्रकारातील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्णपदके जिंकली होती.
तत्पूर्वी, नीरजवर संपुर्ण भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरियाणा सरकारने त्याला 7 कोटी आणि वर्ग अ गटातील नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा यांनी त्याला क्सयूव्ही कार देण्याचीही घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका
घरापासून १५-१६ किलोमीटर दूर सरावासाठी जायचा ‘गोल्ड मेडलिस्ट’ निरज, वडिलांनी सांगितला संघर्ष






