आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर अॅरॉन फिंचने आज, 3 जुलैला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
त्याने आज तिरंगी टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे विरुद्ध 172 धावांची खेळी केली. या धावा त्याने फक्त 76 चेंडूत 16 चौकार आणि 10 षटकारांच्या सहाय्याने केल्या आहेत.
हा पराक्रम करताना त्याने त्याचाच आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मागे टाकला आहे. याआधी त्याने हा विक्रम 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध 156 धावा करुन केला होता. त्यानंतर आता 5 वर्षांनी त्याने त्याचाच विक्रम मोडला आहे.
फिंचने आज केलेल्या या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाने 20 षटकात 2 बाद 229 धावा केल्या आहे. तसेच त्याने डॉर्सी शॉर्टसोबत 223 धावांची विश्वविक्रमी भागिदारीही केली आहे.
मात्र त्याला ट्वेन्टी20 मध्ये विंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने केलेल्या सर्वोच्च 175 धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 3 धावा कमी पडल्या.
गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरीयर्स विरुद्ध 175 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–होय, किंग कोहलीला साहेब घाबरले आहेत…
–ब्लाॅग: आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये आशियायी क्रिकेटर्सची उपेक्षाचं?
–भारतीय अ संघाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये लोळवले; जिंकली तिरंगी मालिका