सध्या भारतीय ब संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. तर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान भारतीय संघातील युवा खेळाडू पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे इंग्लंडला रवाना होणार आहेत. असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, देवदत्त पडिक्कललाही इंग्लंड दौऱ्यावर पर्यायी खेळाडू म्हणून पाठवले जाऊ शकते, परंतु असे झाले नाही. यामागचे कारण काय आहे? जाणून घेऊया.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर सराव सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खानला देखील दुखापत झाली होती .ज्यामुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यावरून बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे इंग्लंडला रवाना होणार आहेत. बीसीसीआयने सोमवारी (२६ जुलै) यासंदर्भात अधिकृत घोषणा देखील केली आहे. परंतु यात विराट कोहलीचा आयपीएलमधील संघ सहकारी पडिक्कलचे नाव नाही. (Find out why devdutt padikkal not named in test team)
या कारणामुळे देवदत्त पडिक्कलला नाही मिळाली संधी
देवदत्त पडिक्कल सध्या भारतातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू आहे. परंतु या खेळाडूने लिस्ट-ए आणि टी-२० क्रिकेटमध्ये साजेशा धावा केल्या नाहीत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही स्वतःला सिद्ध केले नाही. त्याने १५ प्रथम श्रेणी सामन्यात एकही शतक झळकावले नाही. यामध्ये त्याने ३८.८८ च्या सरासरीने ९०७ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ८६.६८ सरासरीने १३८७ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ४३.११ च्या सरासरीने १४६६ धावा केल्या आहेत.
त्यामुळे निवडकर्त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, त्याने लाल चेंडूने आणखी एक स्पर्धा खेळावी. त्यानंतर त्याच्या निवडीचा विचार केला जाईल.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हेनमध्ये संधी?
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये तेव्हाच संधी मिळू शकते, जेव्हा कुठला फलंदाज दुखापतग्रस्त झाला किंवा तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत असेल. हे दोघेही पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळताना न दिसण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघासाठी मयंक आणि रोहित हे डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर, केएल राहुल मध्यक्रमात फलंदाजी करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
थाला फॅन्सची इच्छा झाली पूर्ण; ‘रेट्रो जर्सी’मध्ये दिसला एमएस धोनी, फोटो भन्नाट व्हायरल






