---Advertisement---

रिंकूने अखेरच्या चेंडूवर मारला गगनचुंबी सिक्स, पण खात्यात जोडल्या गेल्या 0 धावा; ICCचा हैराण करणारा नियम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 24, 2023 10:37 AM
Rinku-Singh
---Advertisement---

Rinku Singh Six: भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सने पराभव केला. असे असले, तरीही सगळी मैफील रिंकू सिंग या युवा विस्फोटक फलंदाजाने लुटली. संघाला 5 षटकात 50 धावांच्या आसपासचे आव्हान असताना रिंकू सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यानंतर सामन्याचा शेवट करण्याची सर्व जबाबदारी रिंकूवर आली होती. तो एका बाजूने भारतीय संघाची खिंड लढवत होता, पण दुसऱ्या बाजूने झटपट विकेट्स पडत होत्या. अखेरीस सामना अशा स्थितीत पोहोचला, जिथे भारताला 1 चेंडूत 1 धावेची गरज होती. मात्र, रिंकून अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत भारताला सामना जिंकून दिला. मात्र, हा षटकार रिंकू आणि संघाच्या खात्यात गेला नाही. याचेच कारण आपण जाणून घेऊयात…

झाले असे की, भारतीय (Team India) संघाच्या डावातील अखेरचे म्हणजेच 20वे षटक सीन ऍबॉट टाकत होता. यावेळी त्याच्या अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंग (Rinku Singh) याने विजयी षटकार मारला, पण तो नो बॉल होता. नियमानुसार, नो बॉलनेच भारत विजयी झाला होता. त्यामुळे तो षटकार रिंकूच्याही खात्यात गेला नाही आणि संघाच्याही. रिंकूने या सामन्यात 14 चेंडूत 22 धावांची नाबाद खेळी केली. त्याने षटकार मारला असता, तर त्याची धावसंख्या नाबाद 28 झाली असती. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी20 सामना
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने जोश इंग्लिस याच्या वादळी 110 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 208 धावा चोपल्या. जोशव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ यानेही 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. स्मिथने त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच या सामन्यात सलामीला फलंदाजी केली. यावेळी भारतीय संघाकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयसवाल याने 8 चेंडूत 21 धावा करून भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. मात्र, त्याने उपकर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला सामन्यादरम्यान डायमंड डक (एकही चेंडूचा सामना न करता बाद होणे) पद्धतीने बाद केले. यानंतर इशान किशन (58) आणि सूर्यकुमार यादव (80) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारत आव्हानाचा जवळ पोहोचण्यात यशस्वी झाला. शेवटी रिंकू सिंगने 14 चेंडूत 22 धावांची खेळी साकारत त्याने सामना संपवला. (finisher rinku singh winning six which was not added to his and team india account see video here)

हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर सूर्या ‘या’ 3 भारतीयांवर नाराज; म्हणाला, ‘तुम्हाला एवढंच सांगतो, लय…’
‘या’ भारतीय खेळाडूच्या लग्नाचा उडाला बार, स्वातीच्या प्रेमात झाला क्लीन बोल्ड; वाचा कोण आहे तो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---